मुंबई: फिट राहण्यासाठी जिमला जाणं, व्यायाम करणं चांगलं असतं. पण एका रात्रीत कुणी स्लिम होत नाहीत. मग काही महत्त्वाच्या दिवशी आपल्याला बारीक दिसायचं असतं, आपली टमी लपवायची असते, तेव्हा स्वत:ला कसं कॅरी करायचं पाहा... आपल्या राहणीमानाकडे थोडं लक्ष दिलं तर आपला लूक थोडा स्लिम करू शकता.
आणखी वाचा - वजन कमी करताय? या गैरसमजांपासून दूर राहा!
पाहा खास पाच टिप्स
१. खूप टाइट कपड्यांपासून वाचा - टाइट आणि स्किन फिट कपडे वापरू नये. याचा अर्थ असा नाही की आपण ओव्हरसाइज कपडे वापरावे. अगदी थोडे ढिले कपडे घालावे, ज्यानं आपली टमी बाहेर दिसणार नाही आणि आपण खूप हेवी पर्सेनालिटी वाटणार नाही.
२. कमी झोप टाळा - संशोधकांनुसार जे लोकं ७ तासांहून कमी वेळ झोपतात त्यांच्यात स्थूलपणा वाढण्याची शक्यता जास्त असते. कमी झोपेचा परिणाम भूकेवर नियंत्रण ठेवणारे हार्मोन्स घ्रेलिन आणि लॅप्टिनवर होतो. कमी झोप झाल्यास ते असंतुलित होतात. जर आपण आपलं वजन नियंत्रणात ठेवू इच्छितात तर रात्रीची झोप पूर्ण आणि शांत झोप घ्या.
३. ब्राइट कलर्सपासून दूर राहा - जर आपल्याला ब्राइट कलर्स आवडतात. तर त्यापासून जरा दूर राहणं सुरू करा. थोडे सोबर आणि डल कलर्समध्ये आपण अपेक्षेपेक्षा कमी लठ्ठ वाटाल. प्रयत्न करा प्लेन कपड्यांऐवजी लाइन्स किंवा चेक्स प्रिंट वापरा.
४. लो वेस्ट जीन्स घालू नका - फॅशनच्या जगात आपणही आंधळे होऊन लो वेस्ट जीन्स सारखे प्रयोग करतो. पण त्यापासून दूर राहा. लो वेस्ट जीन्स घातल्यानं आपल्या कमरेखालचा भाग अधिकच हेवी दिसेल. अधिक फॅशनेबल दिसण्यापेक्षा आपण डीसेंट लूकवर भर द्या, त्यानं आपण बारीक दिसाल.
५. पॉकेटवर लक्ष द्या - अनेकांना सवय असते पॅन्टच्या खिशात खूप काही वस्तू भरून ठेवतात. जर आपण लठ्ठ असाल तर आपली ही सवय बदला. अधिक सामान ठेवल्यानं आपलं पॉकिट कपड्यांची मजा कमी करतं आणि लूक अधिक लठ्ठ दिसतो.
आणखी वाचा - आपला रंग उजळण्यासाठी हे खा!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.