संध्याकाळी या ३ गोष्टी कधीच करू नका

संध्याकाळच्या वेळी हे करु नका, ते करू नका असे अनेक लोक आजही म्हणतात. संध्याकाळी काही कामे करणे हे अशुभ मानले जाते. शास्त्रातही संध्याकाळी काही कामे करु नये असं सांगितले आहे.

Updated: Jan 16, 2016, 08:36 PM IST
संध्याकाळी या ३ गोष्टी कधीच करू नका title=

मुंबई : संध्याकाळच्या वेळी हे करु नका, ते करू नका असे अनेक लोक आजही म्हणतात. संध्याकाळी काही कामे करणे हे अशुभ मानले जाते. शास्त्रातही संध्याकाळी काही कामे करु नये असं सांगितले आहे.

३ गोष्टी सांयकाळी करु नका :

१. जेवण : संध्याकाळच्या वेळ ही जेवणासाठी योग्य नसल्याचं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. झोपण्यापूर्वी 2 तास आधी जेवण करणे हे आरोग्यासाठी चांगले असते असं सांगण्यात आलंय. संध्याकाळी जेवण केल्याने पोटासंबंधी समस्या निर्माण होतात. अपचन, गॅस, पोटात दुखणे या सारख्या समस्या उद्भवू शकतात. संध्याकाळी फळे खाणे उत्तम आहे. 

२. शारीरिक संबंध : संध्याकाळी स्त्री आणि पुरुषानी शारीरिक संबंध ठेऊ नये. संध्याकाळी शारिरीक संबंध ठेवल्यास आरोग्य विषयी समस्या निर्माण होतात. त्यामुळे रात्रीची वेळ ही शारिरीक संबंधासाठी योग्य मानली जाते. 

३. झोपणे : संध्याकाळी झोपल्याने निद्रानाशाची समस्या निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. संध्याकाळी झोपल्याने रात्री झोप येत नाही. रात्रीची वेळ ही झोपण्यासाठी चांगली असते. इतर वेळी झोपणे हे आरोग्य बिघडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. अशक्तपणा, डोके दुखी, चक्कर येणे या सारख्या समस्या उद्भवू शकतात.