मुंबई : आज प्रत्येकाला सुंदर दिसायचंय. त्यामुळे बाजारात सुंदर करणाऱ्या अनेक क्रिम आणि इतर वस्तू उपलब्ध आहेत पण त्याचे अनेक साईड इफेक्टसही आहे. पण दक्षिण भारतातील महिला या सुंदर असतात. याचं कारण तुम्हाला माहित आहे. जाणून घ्या.
१. नारळ : नारळपाणी पिल्याने चेहऱ्यावर एक चमक येते. त्यासाठी चांगल्या त्वचेसाठी रोज नारळपाणी प्यावे. दक्षिण भारतात खूप मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे आढळतात. दक्षिण भारतातील लोक नारळाच्या तेलाचा जेवणात समावेश करतात.
३. सुंदर त्वचा : रोज रात्री झोपताना तळव्यांना आणि अवयवांना मालिश केल्याने आपल्याला त्याचा फायदा जाणवतो. त्यामुळे आपल्या त्वचेला नुकसान पोहतच नाही. नारळाच्या तेलाने रात्री संपूर्ण अंगाला मालिश करा. तुमची त्वचा कोमल होईल.
३. सुंदर केस : दक्षिण भारतातील महिला त्यांच्या काळेभोर आणि लांब केसांसाठी प्रसिद्ध आहे. केसांना आठवड्याभरात किमान २ ते ३ वेळा मालिश करा. केस धुण्यासाठी हर्बल शॅम्पुचा वापर करा.