निर्मला सामंत - प्रभावळकर, प्रवक्त्या, काँग्रेस
राज्यात आजही आघाडी सरकारचं राज्य आहे. आणि हे सरकार अतिशय उत्तम प्रकारे प्रशासनाचा कारभार पाहत आहे. राणे-जाधव वाद ही नक्कीच गंभीर बाब आहे. पण अशाप्रकारे वादविवाद केल्याने आघाडी काही बिघाडी होईल असं मला वाटत नाही.
काँग्रेसचा नेहमीचा अजेंडा राहिला आहे की, सनदशीर मार्गाचा वापर करून आणि कायदा कोठेही हातात न घेता प्रत्येक गोष्टीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न असतो. राणे तसे अनेक वर्ष सक्रिय राजकारणात आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना तोंड द्यायाची त्यांना सवय झाली आहे. पण अनेक वेळा असं म्हटंल जातं की, ते शिवसेनेतून आल्यामुळे त्यांच्यातील असणारा कडेवेपणा या गोष्टीस कारणीभूत आहे. मला असं वाटतं राणे यांनी बऱ्यापैकी काँग्रेस संस्कृतीत स्वत:ला जुळवून घेतले आहे.
जाधवांच्या वक्तव्यानंतर राणे म्हणाले की, 'योग्य वेळी योग्य उत्तर देईन.' त्यांचा या वक्तव्याने ते बॅकफूट वर गेले आहेत का? असं अनेकांना वाटतं. पण तसं नाहीये कारण की त्यांच्या या वागण्यातूनच स्पष्ट होतं की त्यांच्या अंगी काँग्रेस संस्कृती चांगलीच मुरली आहे, उगाच आतातायी वक्तव्य न करता राणे यांनी आपली परिपक्वता दाखवून दिली आहे.
परंतु गेले काही दिवस हे जे काही वाद होत आहेत आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या फोडाफोडीचे राजकारण यांमुळे आघाडी सरकारला गालबोट तर नक्कीच लागंल आहे. कारण की प्रत्येकांने सामाजिक परिस्थितीचं भान हे ठेवलंच पाहिजे.
राणे हे धाडसी नेते आहेत, नीतेश राणे बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देतात. या सगळ्या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच राणे यांचे विरोधक वाढत आहेत. चांगल्या गोष्टी केल्याने अनेकांना त्याचा अडसर वाटू लागतो.
त्याचप्रमाणे राष्ट्रवादीनेही इतकी टोकाची भूमिका घेणं हे अत्यंत चुकीच होतं, भास्कर जाधवांची बेताल बडबड यामुळे त्यांना सरकारमध्ये ते एक मंत्री आहेत याचा विसर पडलेला दिसून येतो. खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी केलेली वक्तव्य ही घृणास्पदच होती. मला आशा आहे की, लवकरच या सगळ्यातून आघाडी मार्ग काढेलच.