मोदी जेव्हा दिल्लीत मेसमध्ये जेवायचे...

नरेंद्र मोदी 26 मे रोजी देशाचे पंतप्रधान होणार आहेत, यानंतर ते सेव्हन रेसकोर्स रोडवर राहणार आहेत. येथे त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा असणार आहेत.

Updated: May 21, 2014, 03:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी 26 मे रोजी देशाचे पंतप्रधान होणार आहेत, यानंतर ते सेव्हन रेसकोर्स रोडवर राहणार आहेत. येथे त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा असणार आहेत.
मात्र जेव्हा 1990 मध्ये मोदी भाजपा सरचिटणीस म्हणून दिल्लीत राहत होते, तेव्हा त्यांचं जीवन वेगळं होतं. तेव्हा ते 17 तास काम करत होते, जेवण मेसमध्ये करत होते. आणि मित्राच्या कारमधून फिरत होते.
मोदी भाजपाच्या मुख्यालयाजवळ असलेल्या 9, अशोकरोड बंगल्यात राहत होते, येथे मोदी 2001 पर्यंत राहिले, येथे असतांनाच त्यांना गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं.
पंतप्रधानपद निश्चित झाल्यानंतर 17 मे रोजी मोदी पुन्हा दिल्लीत आले, आणि या घरात काही वेळ त्यांनी घालवला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.