www.24taas.com, झी मीडिया, धुळे
मतदार यादीत नाव असताना एखादा बोगस मतदार येऊन आपल्या नावावर मतदान करून गेल्याची घटना घडू शकते... मात्र, अशा वेळी निराश होऊ नका... टेंडर वोटच्या माध्यमातून आयोगाने खऱ्या मतदाराला न्याय दिलाय.
मतदारयादीत नाव आहे म्हणून मतदानाला जावं आणि आपल्या नावावर कुणा बोगस मतदाराने मतदान केल्याचं लक्षात यावं, असं झालं तर निराश होऊ नका... `टेंडर व्होट`च्या माध्यमातून मतदान करता येईल. फक्त हे मतदान यंत्रावर न करता मतपत्रिकेवर करावं लागणार आहे.
मतपत्रिकेवर व्होट केलंत तरी तुमचं मत फुकट जाणार नाही... त्याची मोजणी केली जाईल. लोकशाहीत कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी ही तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे... तेव्हा मतदारराजा... सावध हो...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.