वरुण गांधींवरून वाद, प्रियंकाच्या टीकेवर मनेकाचा पलटवार

काँग्रेसची स्टार प्रचारक आणि काँग्रेस अध्यक्षा सोनियांची कन्या प्रियंका गांधी-वढेरानं सुल्तनापूरच्या जनतेला वरूण गांधींना पराभूत करण्याचं आवाहन करत नव्या वादाला तोंड फोडलंय. प्रियंकाच्या या आवाहनावर वरुणची आई मनेका गांधी यांनी प्रियंकावर पलटवार केलाय. मनेकानं म्हणटलं की देशाची सेवा करणं म्हणजे रस्ता भटकणं नाही. निवडणुकीनंतर तर हे जनताच दाखवून देईल.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 13, 2014, 11:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसची स्टार प्रचारक आणि काँग्रेस अध्यक्षा सोनियांची कन्या प्रियंका गांधी-वढेरानं सुल्तनापूरच्या जनतेला वरूण गांधींना पराभूत करण्याचं आवाहन करत नव्या वादाला तोंड फोडलंय. प्रियंकाच्या या आवाहनावर वरुणची आई मनेका गांधी यांनी प्रियंकावर पलटवार केलाय. मनेकानं म्हणटलं की देशाची सेवा करणं म्हणजे रस्ता भटकणं नाही.
निवडणुकीनंतर तर हे जनताच दाखवून देईल.
शनिवारी अमेठीमध्ये राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा प्रियंकानं गौरीगंज इथं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. प्रियंकानं वरूणला साफ हृदयानं जनतेसोबत येणाचा सल्ला दिला. आपल्या भाषणात प्रियंकानं वरुणला आपल्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणटं, भाऊ म्हटलं. मात्र कुटुंबातील हा सदस्य आपला रस्ता चुकलाय. त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी सुल्तानपूरहून जनतेनं त्यांचा पराभव करावा, असं आवाहन प्रियंकानं केलं.
काही दिवसांपूर्वी एका सभेत वरुण गांधीनं अमेठीमध्ये राहुल गांधींच्या कामाची स्तुती केली होती. वरुणच्या त्या वक्तव्यानं चांगलीच खळबळ माजली होती. दोन्ही कुटुंबामधलं नातं सुधारत असल्याचा अंदाज या वक्तव्यावरुन लावला जात होता. मात्र त्यानंतर लगेचच मनेका गांधीनं वरूणला सल्ला देत या चर्चेवर पूर्णविराम लावला होता.
आता पुन्हा एकदा दोन्ही कुटुंबातील वाद उफाळून येतोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.