www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शेकडो कोटींचं नुकसान झाल्यानंतर आणि अनेक शेतक-यांचे बळी गेल्यानंतर अखेर निवडणुकीच्या रणधुमाळीत रमलेल्या सत्ताधा-यांना जाग आली आहे.
गारपीटग्रस्तांना अखेर सरकारनं दिलासा दिलाय. गारपीटग्रस्त शेतक-यांसाठी चार हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलंय. २ हेक्टर्ससाठी मदत देण्यात येणार आहे.
जिरायती शेतीसाठी हेक्टरी १० हजारांची मदत, बागायती शेतीसाठी हेक्टरी १५ हजारांची तर फळबागांसाठी हेक्टरी २५ हजारांचं पॅकेज जाहीर करण्यात आलंय. त्याचबरोबर शेतीकर्जावरचं व्याज माफ करणार.
कर्जवसुलीलाही स्थगिती देण्यात आलीय. त्याशिवाय वीज बिलही सहा महिन्यांसाठी माफ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे सगळे निर्णय झालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.