www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्पाईसजेटनं मंगळवारी जाहीर केलेल्या एक रुपया तिकीट सेवेला डीजीसीएनं ब्रेक लावलाय. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए)नं बजेट एअरलाइन्स स्पाइसजेटच्या या स्कीमला तत्काळ थांबविण्याचे आदेश दिलेत. ही स्कीम म्हणजे बाजाराला धक्का पोहचवणारी आणि गोंधळ निर्माण करणारी असल्यानं तत्काळ थांबविण्यात यावी, असं डीजीसीएनं म्हटंलय.
कमीत कमी दरांत विमान सेवा प्रदान करणाऱ्या स्पाईसजेटनं मंगळवारी आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध भारतात केवळ एक रुपयात विमान सेवा देण्याची योजना सुरू केली होती. यानंतर काही तासांतच डीजीसीएनं एअरलाइन्सला निर्देश दिले. यामुळे, केवळ बाजारावरच वाईट परिणाम होणार नाही तर सिव्हिल एव्हिएशनच्या नियमांच्या नियम १३५ अंतर्गत ‘गडबड’ म्हणूनही गणली जाऊ शकते, असं डीजीसीएननं निर्देश देताना म्हटलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, स्पाईसजेटची ही योजना म्हणजे प्रवाशांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक आहे. या योजनेंतर्गत प्रवाशांना केवळ एक किंवा दोन सीट उपलब्ध करून दिले जातात. अन्य एअरलाईन्सने स्पाईसजेटच्या एक रुपयांत विमानप्रवास या योजनेची तक्रार दाखल केली होती. त्यावर डीजीसीएनं ही कारवाई केलीय.
महत्त्वाचं म्हणजे, स्पाईसजेटची स्किम ही पाचव्या महिन्यात तिसऱ्यांदा जाहिर झाली होती. त्यांनी १ रुपयांत तिकीट विक्रीचा घोषणा केली होती. त्यात एक रुपयाची ऑफर असलेलं विमानाचं तिकीट फक्त ७९९ आणि १४९९ रुपयांमध्ये मिळणार होत. स्पाईसजेटला डिसेंबर महिन्यात १७१ कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.