www.24taas.com,झी मीडिया, अमेठी
अमेठीतील घमासान शिगेला पोहोचलंय. प्रियंका गांधींची पीए प्रिती सहाय ही अमेठीतील एका मतदान केंद्रावर होती. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी त्याला आक्षेप घेतला आणि प्रिती सहायला बाहेर काढलं.
आज अमेठीमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं भविष्य पणाला लागलंय. यंदा पहिल्यांदाच राहुल गांधी मतदानाच्यावेळी चक्क अमेठीत उपस्थित आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मतदानकेंद्रांवर ताबा घेऊन मतदारांना धमकावण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप भाजपच्या स्मृती इराणी आणि आम आदमी पक्षाचे कुमार विश्वास यांनी केलाय.
अशातच स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधी-वढेरा यांच्या सेक्रेटरीला एका मतदान केंद्रावर पाहिलं आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. स्मृती इराणी यांनी मतदानकेंद्रात सहाय यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला. त्यानंतर प्रिती सहाय मतदान केंद्रातून निघून गेल्या. निवडणूक आयोगानं त्यांना त्वरीत अमेठी सोडण्याचे आदेश दिले.
या सर्व प्रकारावरून २०१४ची ही लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी किती कठीण झालीय हे दिसून येतं. शिवाय राहुल गांधीही नरेंद्र मोदींना घाबरले की काय? असाही सवाल विचारला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.