... तर मुस्लिमांची डीएनए टेस्ट करावी लागेल - अबू आझमी

उत्तरप्रदेशात मुस्लिमबहुल भागांमध्ये प्रचार करतांना जे मुसलमान समाजवादी पार्टीला मत देणार नाहीत त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असं खळबळजनक विधान अबु आझमींनी केलंय. भाजपच्या मुख्तार अब्बास नकवींनी अबु आझमींवर या विधानाप्रकरणी टीकास्त्र सोडलयं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 2, 2014, 03:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
उत्तरप्रदेशात मुस्लिमबहुल भागांमध्ये प्रचार करतांना जे मुसलमान समाजवादी पार्टीला मत देणार नाहीत त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असं खळबळजनक विधान अबु आझमींनी केलंय. भाजपच्या मुख्तार अब्बास नकवींनी अबु आझमींवर या विधानाप्रकरणी टीकास्त्र सोडलयं.
एकूणचं २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा दर्जा घसरलाय कमालीचा घसरला आहे हे नेहमी वादग्रस्त विधाने करून चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे नेते नेते अबु आझमी यांच्या विधानावरुन स्पष्ट होतं. नव्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. जे मुस्लिम समाजवादी पक्षाला मतदान करत नाहीत, ते खरे मुस्लिम नाहीत असा शेरा अबू आझमी यांनी मारला.
मुलायमसिंग यादव यांनी मुस्लिमांसाठी काय केले नाही? त्यांनी नेहमी देशातील अल्पसंख्यांच्या भल्यासाठी योग्य निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जे मुस्लिम समाजवादी पक्षाला मत देत नाहीत त्यांना खरे मुस्लिम कसे म्हणायचे, असा सवाल आझमी यांनी उपस्थित केला. ते समाजवादी पक्षाचे लोकसभा उमेदवार भालचंद्रा यादव यांच्या प्रचाररॅलीत बोलत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.