www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद
चेन्नईमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नरेंद्र मोदी सीमांध्रमध्ये रॅली करणार होते. याआधीच मोदींची सिक्युरीटी वाढवण्यात आली. या आधी देखील मोदींवर आत्मघाती हल्ला होऊ शकतो, या कारणास्तव त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. पण आता त्यात अजून वाढ करण्यात आली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, `मोदी हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. चेन्नईमध्ये झालेल्या रेल्वे स्फोटानंतर राज्यात मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोदी सीमांध्रच्या ज्या भागात जाणार होते. तिथे सुरक्षा वाढवण्यात आली होती. मोदींच्या सुरक्षा रक्षकांत आता वाढ करण्यात आल्याने त्यांना अतिरिक्त सुरक्षा रक्षक देखील देण्यात आले आहेत.
मोदी यांनी सीमांध्रच्या मदनापल्ले, नेल्लोर, गुंटूर, भीमावरम आणि विशाखापट्टणम येथे पाच सभा घेतल्या आहेत. या भागात ७ मे रोजी मतदान होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.