मुंबई राड्यानंतर राज ठाकरेंचे मौन, मांजरेकर यांची कॉमेडी

शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यात दक्षिण मुंबईत झालेल्या राड्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मौन बाळगणं पसंत केलं. गोरेगावमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा असतानाही, या राड्याबाबत त्यांनी चकार शब्द उच्चारला नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 4, 2014, 12:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यात दक्षिण मुंबईत झालेल्या राड्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मौन बाळगणं पसंत केलं. गोरेगावमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा असतानाही, या राड्याबाबत त्यांनी चकार शब्द उच्चारला नाही.
मला जे बोलायचं होतं, ते याआधीच बोललोय. पुन्हा समोरून काही आलं, तर मी पुन्हा बोलेन, एवढाच सूचक इशारा त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न दिला. दरम्यान, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचं त्यांनी पुन्हा एकदा गुणगान गायलं.
माझे खासदार निवडून आल्यानंतर मोदींना पाठिंबा देतील, असं राज यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंच्या या सभेत उत्तर पश्चिम मुंबईचे मनसेचे उमेदवार महेश मांजरेकर यांनी प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. ट्रेनमधून प्रवास करणा-या मुंबईकरांची कशी वाट लागते, याची एक सटायरिकल ब्लॅक कॉमेडी त्यांनी सादर केली. त्याला चांगलीच दाद मिळाली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ