आ जाओ प्रियांका, छा जायो प्रियांका!

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी दबाव आणला जात आहे. काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर ही कार्यकर्त्यांकडून ही मागणी जोर धरतेय.

Updated: May 19, 2014, 06:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी दबाव आणला जात आहे. काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर ही कार्यकर्त्यांकडून ही मागणी जोर धरतेय.
यासाठी उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी पोस्टर लावले जातायत.
कारण प्रियांका गांधी यांनी अमेठी आणि बरेलीत सभा घेतल्या, सोनिया गांधी आणि राहुल गांधी निवडून आले, उत्तर प्रदेशात अवघ्या दोनच जागा काँग्रेसला मिळाल्या बाकी सर्व ठिकाणी काँग्रेसला धुळ चारण्यात आली.
प्रियंका गांधी यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात विरोधकांच्या टीकेला चांगलच उत्तर दिलं आहे, प्रियांका गांधी यांनी दिलेलं प्रत्युत्तरही अनेकांना भावलं आहे.
प्रियांका गांधी यांनी सक्रीय राजकारणाला सुरूवात केली, तर काँग्रेसला पुढच्या काळात चांगले दिवस येतील, असं काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.