www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पंतप्रधानपदासाठी ‘एनडीए’नं अधिकृतरित्या नरेंद्र मोदींचं नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय. त्यामुळे, आता मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलीय.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार किंवा कोणत्या जागी कोण निवडून येणार यासंबंधीचे अनेक मॅसेजेस सोशल मीडियाद्वारे पसरवले जात होते... यावरून सट्टाबाजारालादेखील तेजी आली होती... आता, तीच तेजी ‘मोदी मंत्रिमंडळा’ला आलीय. अधिकृतरित्या नवं केंद्रीय मंत्रिमंडळ जाहीर होण्यापूर्वीच सोशल मीडियावर या मंत्रिमंडळाचं चित्र उभं करणारे मॅसेजेस दिसू लागलेत...
अजून अधिकृतरित्या मंत्रिमंडळ जाहीर होणं बाकी आहे त्यामुळे हा मॅसेज फार गंभीरतेनं घेण्याची गरज नाही... पण, या नावांवर लक्ष टाकताना हा मॅसेज दुर्लक्ष करण्यासारखाही नाही, असं तुमच्याही नक्कीच लक्षात येईल.
कुणाला मिळणार कोणतं मंत्रिपद... पाहा, ‘सोशल मीडिया’तली संभाव्य यादी
गृह - राजनाथ सिंह
अर्थ - सुब्रमण्यम स्वामी
परराष्ट्र - अरुण जेटली
संरक्षण - सुषमा स्वराज
रेल्वे - व्यंकय्या नायडू
नगरविकास, वाहतूक - नितिन गडकरी
कृषि - गोपीनाथ मुंडे
ग्रामविकास - अनंत गीते
आरोग्य - हर्ष वर्धन
कायदा - रवि शंकर प्रसाद
वाणिज्य - एस एस अहलुवालिया
दूरसंचार - अनंत कुमार
कोळसा - हंसराज आहिर
पेट्रोलियम - रामविलास पासवान
अवजड उद्योग - आनंदराव अडसूळ
हवाई वाहतूक - शाहनवाज़ हुसेन
अल्पसंख्यांक कल्याण - मुख़्तार अब्बास नकवी
संसदीय कामकाज - सुमित्रा महाजन
महिला बालकल्याण - अनुप्रिया पटेल
मनुष्यबळ विकास - बी एस येदुरप्पा
जलस्रोत - पुरुषोत्तम रुपाला
क्रीडा - कीर्ति आझाद
पर्यटन - श्रीपाद नाईक
सांस्कृतिक कार्य - मीनाक्षी लेखी
माहिती प्रसारण - जगदंबिका पाल
कॉर्पोरेट अफेयर्स - अनुराग ठाकुर
अपारंपरिक ऊर्जा - बी सी खंडूरी
अनिवासी भारतीय - राजीव प्रताप रूडी
सामाजिक न्याय - बंडारू दत्तात्रय
गृह राज्यमंत्री - सत्यपाल सिंह
संरक्षण राज्यमंत्री - व्ही के सिंह
कृषि राज्यमंत्री - राजू शेट्टी
सामाजिक न्याय राज्यमंत्री - रामदास आठवले
कायदा राज्यमंत्री - किरीट सोमय्या
क्रीडा राज्यमंत्री - राज्यवर्धन राठोड
लोकसभा सभापती - मुरली मनोहर जोशी
एन.डी.ए. अध्यक्ष / राष्ट्रपती - लालकृष्ण अडवाणी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.