पाहा काय आहे मोदींची ‘दशसूत्री’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं आज त्यांचा दशसूत्री कार्यक्रम आणि अजेंडा ठरवलाय. हा अजेंडाच समोर ठेवून मोदी सरकार पुढं काम करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा 10 सूत्री कार्य़क्रम प्राथमिकतेच्या आधारावर बनवण्यात आलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 29, 2014, 01:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं आज त्यांचा दशसूत्री कार्यक्रम आणि अजेंडा ठरवलाय. हा अजेंडाच समोर ठेवून मोदी सरकार पुढं काम करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा 10 सूत्री कार्य़क्रम प्राथमिकतेच्या आधारावर बनवण्यात आलाय.
सूशासन आणि गुड गव्हर्नेंसवर मोदींनी भर दिलाय. पंतप्रधानांनी काही कामं लवकरात लवकर आटोपण्यावर जोर दिलाय. पंतप्रधानांचे सचिव नृपेंद्र मिश्र यांच्यानुसार, सर्व धोरणांची एका वेळेनुसार योग्य रीतीनं अंमलबजावणी होईल.
ही आहे मोदींची दशसूत्री
1. प्रशासकांचं मनोबल वाढवलं जाईल, त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल.
2. नवीन सूचनांचं स्वागत, प्रशासकाला काम करण्याचं स्वातंत्र्य
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, ऊर्जा यांना प्राधान्य असेल.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणं आणि ई-ऑक्शन द्वारे निविदा काढणं.
5. आंतर मंत्रालतात समन्वयासाठी सरळ, सोपी व्यवस्था
6. मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी योग्य सिस्टिम
7. अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यासाठी प्रयत्न
8. उपलब्ध संसाधनं आणि गुंतवणुकीत सुधारणा
9. अंतिम मुदतीच्या आत धोरणांची अंमलबजावणी
10. सरकारी धोरणांमध्ये स्थैर्य आणि सातत्य आणणं

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.