'स्वदेस' घडवायला, शास्त्रज्ञ निवडणुकीत

निवडणूक आली की राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशिवाय अनेक हवशे-गवशे-नवसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात. मात्र अमेरिकेत शिकलेला, नासामध्ये नोकरी केलेला एक तरुण झेडपीच्या आखाड्यात उतरला आहे.

Updated: Feb 2, 2012, 12:48 PM IST

संतोष लोखंडे, www.24taas.com, बुलढाणा

 

निवडणूक आली की राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशिवाय अनेक हवशे-गवशे-नवसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात. मात्र अमेरिकेत शिकलेला, नासामध्ये नोकरी केलेला एक तरुण झेडपीच्या आखाड्यात उतरला आहे.

 

पण बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातल्या पांग्र डोळे गटातून बाळासाहेब दराडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे त्या २८ वर्षांच्या बाळासाहेब दराडेने अमेरिकेत एमएस केलं असून तो ‘नासा’मध्ये नोकरी करत आहे.अमेरिकेत शिकलेला हा शास्त्रज्ञ झेडपीच्या आखाड्यात उतरला  आहे. या होतकरु युवकाला तरुणांचाही चांगलाच पाठिंबा मिळत आहे.  युवकांना घेऊन त्यांनी घराघरात प्रचार सुरू केला आङे. ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषदेसारखं दुसरं माध्यम नाही असं दराडे यांचं मत आहे.

 

दराडे यांना समाजसेवेचं वेड असल्यामुळं अमेरिकेतल्या ऐषआरामी नोकरीतही त्यांचं मन रमलं नाही. त्यामुळं त्यांनी अमेरिकेतला गाशा गुंडाळत थेट बुलढाणा गाठलं. अण्णा हजारेंच्या आंदोलनानं प्रभावित होऊन दराडे यांनी लोणार तालुक्यातली २० गावं दत्तक घेऊन त्यांच्या विकासाचं कामही सुरू केलं. गावकरी त्यांच्या कामाला आता निवडणूकीत किती प्रतिसाद देतात ते पहावं लागेल.