www.24taas.com, नाशिक
नाशिकमध्ये महायुतीचाच महापौर होईल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगुंटीवार यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये भाजप कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत नाशिकसह इतर निकालाबाबत चर्चा झाली. त्यात नाशिकमध्ये मनसेसोबत जाण्याच्या मुद्यावर बैठकीत चर्चा झाली नसल्याचं प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
ज्या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे, तिथे भाजप आणि आरपीआय सेनेला पाठिंबा देतील. मात्र इतर पक्षांसोबत जाणार नाही, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. नाशिकमध्ये शिवसेना, भाजपा आणि आरपीआय हे पक्ष मिळून महापौर होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात नसल्याने अजूनही सविस्तर चर्चा होण्याची बाकी आहे.
तसचं आज सकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आज झालेल्या बैठकीत नाशिकमधील महापौरपदावरही चर्चा झाल्याचे समजते. याआधी भाजप मनसे सोबत जाणार असा बोलबाला होता मात्र आजच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आता नाशिकचा महापौर महायुतीचाच होणार.