www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सोळाव्या लोकसभा निवडणुकीत देशभरात जवळजवळ 60 लाख मतदारांनी मतदानयंत्रावरचं `नोटा` म्हणजेच `यापैकी कुणीही नाही` हे बटन वापरल्याचं समोर आलंय.
यामध्ये, पाँडिचेरीमध्ये `नोटा` या विकल्पाचा सर्वात जास्त वापर करण्यात आलाय. निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीचे सर्व निकाल घोषित केल्यानंतर दिलेल्या माहितीनुसार, भारतात जवळजवळ 11 टक्के म्हणजेच 59 लाख 78 हजार 208 मतदारांनी `नोटा` हा पर्याय निवडला होता.
पाँडिचेरीमध्ये जवळजवळ तीन टक्के म्हणजेच 22 हजार 268 मतं `नोटा` या पर्यायाला मिळालेली होती. यानंतर मेघालयमध्ये 2.8 टक्के, गुजरातमध्ये 1.8 टक्के, छत्तीसगडमध्ये 1.8 टक्के तसंच दादर आणि नगर हवेलीमध्ये 1.8 टक्के मतदारांनी `नोटा` या बटनाला आपली पसंदी दिली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.