मोदी जिंकले... कमाल खाननं सोडला देश

16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जसजसे समोर आले तसंतसे मोदींविरुद्ध बोलणाऱ्यांची तोंडं बंद झालेली दिसत आहेत. अशा मोदी विरोधकांमध्ये एक नाव आहे अभिनेता कमाल राशिद खान याचं...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 17, 2014, 07:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जसजसे समोर आले तसंतसे मोदींविरुद्ध बोलणाऱ्यांची तोंडं बंद झालेली दिसत आहेत. अशा मोदी विरोधकांमध्ये एक नाव आहे अभिनेता कमाल राशिद खान याचं...
पण, लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच कमाल खाननं देश सोडणं पसंत केलंय. ही गोष्ट कमालनं स्वत:च ट्विटरमार्फत त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचलवलीय.
यंदाच्या लोकसभा निडवडणुकीत कमाल खाननंही निवडणूक लढवून आपलं भविष्य आजमावलं होतं. त्यानं मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविली. या जागेवर बॉलिवूडमधले आणखीही काही सदस्य उभे राहीले होते... परंतु, अखेर विजय मिळवला तो शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी...
कमाल सुरुवातीपासूनच मोदीविरोधी असल्याचं सांगत होता. ट्विटरवर त्यानं यासंबंधी अनेक ट्विटसही केले होते. एका ट्विटमध्ये तर त्यानं `जर मोदी पंतप्रधान झाले तर मी माझं सेक्स बदलून टाकेन आणि करन जोहरसोबत विवाह करेन` असंही वादग्रस्त वक्तव्य कमाल खाननं केलं होतं.
पण, कमाल खानच्या अपेक्षेविरुद्धच घडलं... आणि लोकांनी आपली मतं नरेंद्र मोदींच्या पारड्यात टाकली. यानंतर मात्र कमालनं देशचं सोडलाय. त्यानं ट्विटवर म्हटलंय `मोदी निवडणुकीत जिंकलेत. म्हणून मी शोएब अख्तरसोबत भारत सोडतोय. बाय बाय इंडिया` असं म्हटलंय... यावेळी, त्यानं पोस्ट केलेल्या फोटोत त्याच्याशेजारी पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब अख्तरदेखील दिसतोय.
`मोदीजी जिंकलेत... आणि मी म्हटल्याप्रमाणे भारत सोडतोय. गुड बाय इंडिया फॉर फॉरेवर... मी माझ्या देशाला आणि प्रेमळ लोकांना खूप मिस् करेन` असं कमालनं सोबत म्हटलंय....
कमाल खानच्या या ट्विटवर ट्विटरवासियांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्यात...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.