www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणाऱ्या शपथविधी समारंभाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ येणार असल्याचं नक्की झालंय. सोमवारी सकाळी नवाज शरीफ भारतात येणार आहे. पाक ‘पीएमओ’नं या वृत्ताला अधिकृतरित्या दुजोरा दिलाय. ‘झी मीडिया’ला पाक पीएमओनं फोन करुन ही माहिती दिलीय.
याच संदर्भात नवाज शरीफ यांच्या कन्या मरीयम यांनी ट्विट करुन भारत-पाक मैत्रीचा नवा अध्याय सुरु होणार असल्याचं म्हटलंय. ‘मला असं वाटतं की भारतासोबत चांगले संबंध असलेच पाहिजे… त्यामुळे दोन्ही देशात असलेले मानसिक अडथळे, भय आणि संशयाच्या भिंती दूर होण्यास मदत होईल’ असं मरियम नवाज शरीफ यांनी ट्विट केलंय.
यासंदर्भात पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी औपचारिक घोषणा केली. नरेंद्र मोदींनी सोमवारी होत असलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रण पाठवलं होतं. भारताच्या पंतप्रधानाच्या शपथविधीसाठी पहिल्यादांच पाकचे पंतप्रधान हजर राहणार आहेत. शरिफ यांच्या उपस्थितीमुळे भारत पाकिस्तान मैत्रीचा एक वेगळा अध्याय लिहीला जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.