www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
ज्यांची अनेक दिवसांपासून सर्व माध्यमं आणि नागरीक वाट पाहत होते, त्या जशोदाबेन मोदी आज समोर आल्या. आज गुजरातमध्ये सर्व २६ जागांसाठी मतदान होतंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. मेहसाणा मतदारसंघात त्यांनी मतदान केलं.
जशोदाबेन यांनी १२.३९ मिनिटांनी आपलं मत दिलं. विशेष म्हणजे जशोदाबेन यावेळी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आल्या. यावेळी त्यांची छबी टिपण्यासाठी कॅमेऱ्यांमध्ये चढाओढ सुरु होती. त्यांना पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
नरेंद्र मोदी २००१पासून गुजरातचे मुख्यमंत्री आहे. पण त्यांनी कधीही आपल्या पत्नीची माहिती सार्वजनिकरित्या उघड केली नव्हती. पण लोकसभा निवडणुकीत ९ एप्रिलला बडोद्यातून उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी प्रतिज्ञापत्रात पहिल्यांदाच पत्नी म्हणून जशोदाबेन यांचा उल्लेख केला होता. ४२ वर्षांपूर्वी अल्पवयीन असतांना नरेंद्र मोदींचा विवाह झाला होता. मात्र तीन महिनेच ते एकत्र राहिले होते, त्यानंतर नरेंद्र मोदी घर त्याग करून संघाच्या प्रचारासाठी बाहेर पडले होते.
जशोदाबेन यांनी शुभ मुहूर्तावर मतदान केल्याचं भाजपकडून बोललं जातंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.