मोदींचा दिल्लीत मुक्काम, घेतले वाजपेयींचे आशीर्वाद

नरेंद्र मोदींनी शनिवारी प्रचाराचा अखेरचा टप्पा संपल्यावर तडक दिल्ली गाठलं. नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दिल्लीतल्या संघ मुख्यालयात भेट झाली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 11, 2014, 09:26 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदींनी शनिवारी प्रचाराचा अखेरचा टप्पा संपल्यावर तडक दिल्ली गाठलं. नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दिल्लीतल्या संघ मुख्यालयात भेट झाली. सरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी आणि सुरेश सोनी या संघाच्या तीन वरिष्ठ कार्यकर्त्यांसह भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंहदेखील या बैठकीसाठी उपस्थित होते.
मोदींनी घेतले अटलजींचे आशीर्वाद
मोदींनी दिल्लीत आल्यावर लगेच अटलबिहारी वायपेयींची भेट घेतली. याबाबत मोदींनी ट्विटरवर प्रतिक्रिया नोंदवलीय. ‘प्रचारातल्या अखेरच्या रॅलीला संबोधित केल्यावर अटलजींचे आशीर्वाद घेतले. प्रचाराला सुरूवात करताना अटलजींना भेटलो होतो त्यांना भेटणं हे नेहमीच विशेष असतं…’ असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
विशाल, कल्पक आणि समाधानकारक
नरेंद्र मोदी यांनी आपल्या ब्लॉगवरुन या संपूर्ण निवडणूक प्रचारावर भाष्य केलंय. या काळात मिळालेल्या लोकांच्या प्रतिसादामुळे मी भारावलो असल्याचं मोदींनी म्हंटलंय. विशाल, कल्पक आणि समाधानकारक या तीन शब्दात मोदींनी या संपूर्ण प्रचारमोहिमेचं वर्णन केलंय.
ब्लॉगमध्ये मोदी म्हणतात, ‘26 मार्च 2004 पासून आजपर्यंत मी 440 सभा घेतल्या. या काळात देशातली विविधता, संस्कृती आणि सौंदर्याचे मला पुन्हा एकदा दर्शन झाले. या काळात लोकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे मी भारवलो आहे. विशाल, कल्पक आणि समाधनकारक हे तीन शब्दच मला याबाबत सुचतात’

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.