मोदींच्या कॅबिनेटचा पहिला दणका, काळ्या पैशाच्या चौकशीसाठी SIT!

आज सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर संध्याकाळी मोदींच्या कॅबिनेटनं एक दणका देणारा निर्णय घेतलाय. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 27, 2014, 08:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आज सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर संध्याकाळी मोदींच्या कॅबिनेटनं एक दणका देणारा निर्णय घेतलाय. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरूनच काळ्या पैशाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्याचं सांगत न्या. एम. बी. शाह एसआयटीचे अध्यक्ष असतील, असं केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं. तसंच सीबीआयचे संचालक, रॉचे सचिवही तपास पथकाचे सदस्य असतील. एसआयटीच्या उपाध्यक्षपदी न्या. अरिजित पसायत असून रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नरही एसआयटीमध्ये सदस्य असतील.
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक होणार आहे. पहिल्याच दिवशी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काळ्या पैशाप्रश्नी सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
याप्रकरणी यापूर्वीच सुप्रीम कोर्टानं सरकारला एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र यूपीए सरकारनं त्यावर कुठलंही पाऊल उचललं नाही. पण आता मोदी सरकारनं एसआयटी स्थापन केली. त्यामुळं विदेशात असलेला काळा पैसा परत आणण्याच्या दृष्टीनं एक पाऊल टाकण्यात आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.