www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक कधी होणार याची उत्सुकता संपली. आज निवडणुकीची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील तिन्ही टप्प्यांतील निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात १०, १७ आणि २४ एप्रिलला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यांत विदर्भातील मतदार संघांमध्ये, दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये तर तिसऱ्या टप्प्यांत मुंबईसह कोकणातील मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
निवडणूक वेळापत्रक पुढील प्रमाणे
पहिला टप्पा - १० एप्रिल
मतदारसंघ - बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली-चिमूर
- अधिसूचना जारी करण्याची तारीख - १५ मार्च
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस - २२ मार्च
- अर्जांची छाननी - २४ मार्च
- अर्ज मागे घेण्याची तारीख - २६ मार्च
दुसरा टप्पा - १७ एप्रिल
मतदारसंघ - हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, कोल्हापूर, माढा
- अधिसूचना जारी करण्याची तारीख - १९ मार्च
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस - २६ मार्च
- अर्जांची छाननी - २७ मार्च
- अर्ज मागे घेण्याची तारीख - २९ मार्च
तिसरा टप्पा - २४ एप्रिल
मतदारसंघ - मुंबई उत्तर, मुंबई वायव्य, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, औरंगाबाद, दिंडोरी, पालघर, कल्याण, ठाणे रायगड, नाशिक, भिवंडी, जालना
- अधिसूचना जारी करण्याची तारीख - २९ मार्च
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस - ५ एप्रिल
- अर्जांची छाननी - ७ एप्रिल
- अर्ज मागे घेण्याची तारीख - ९ एप्रिल
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.