www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलानं सत्ताधारी जेडीयू म्हणजे जनता दल युनायडेला बिनशर्त पाठींबा दिलाय.
बिहार विधानसभेत उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. सरकारच्या कामाची समिक्षा करत राहणार असं लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केलंय.
बिहारमध्ये नवीन राजकीय समिकरण समोर येतायेत. नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादवे हे कट्टर राजकीय शत्रू आता एकत्र आलेले पाहायला मिळतंय.
आगामी विधानसभा निवडणूक आणि भाजपला टक्कर देण्यासाठीच या दोन्ही पक्षांनी मैत्रीचा हात पुढे केलाय. काँग्रेसनं राजदच्या या निर्णयाचं स्वागत केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.