नवीन पटनायक हे दिवंगत बिजू पटनायक याचे पूत्र आहेत. ते ओडिशाचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. नवीन पटनायक हे आपल्या वडिलांच्या निधनानंतर राजकारणात आले. त्यानंतर त्यांनी स्वतःला देशातील शक्तीशाली नेता म्हणून सिद्ध केले. ११ व्या लोकसभेत अस्का मतदार संघातून १९९६ मध्ये जनता दलाच्या तिकीटावर पोटनिवडणुकीत ते निवडून आले. १९९८ मध्ये ओडिशात त्यांनी बिजू जनता दलाची स्थापना केली. २००० मध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. ते अद्यापपर्यंत सत्तेत आहेत.
बिजू जनता दल हा त्यांचा पक्ष पूर्वी एनडीत सामील होता. पटनायक यांनी एनडीए, यूपीए, आणि तिसऱ्या आघाडीपासून स्वतः दूर ठेवले. आता निवडणुकांनंतर ते कोणाला साथ देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार
आहे.
त्रिशंकू निकाल आल्यास ओडिशाचे मुख्यमंत्री जे तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना आपली बहीण मानतात. त्यामुळे पटनायक जयललिता यांच्या सांगण्यावरून तिसऱ्या आघाडीत जाऊ शकतो. भाजपला २०० पेक्षा कमी जागा मिळाल्यास ते नरेंद्र मोदी ऐवजी दुसरा पंतप्रधानपदाचा उमेदवार झाल्यास भाजपला पाठिंबा देऊ शकतात. तसेच काँग्रेस बहुमताच्या जवळपास आल्यास बीजेडी मुद्द्यावर यूपीएला पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे ते कुंपणावरील खेळाडू असल्याचे म्हटले जात आहे.
बिजू पटनायक हे देखील अविवाहित आहेत. त्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४६मध्ये कटक येथे झाला. नवीन पटनायक यांचे शालेय शिक्षण देहरादून येथे झाले. दिल्ली येथून कला शाखेत पदवी गेतल्यानंतर दिल्लीत ओबेरॉय हॉटेल येथे बुटीक टाकले. लंडन स्टोअर्सला ते आपले कपडे विकायचे.
त्यांना घरात आणि मित्रांमध्ये ‘पप्पू’ या नावाने ओळखले जाते. राजीव गांधी हे नवीन पटनायक यांना डून स्कूलमध्ये तीन वर्ष सिनिअर होते. तर संजय गांधी हे त्यांचे क्लासमेट होते.
दिल्लीतील औरंगजेब रोड येथील घरापासून अस्का मतदारसंघापर्यंतचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. कला शाखेत प्रविण्य मिळवल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांचे अर्धवट काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
बिजू जनता दल आणि भाजप यांच्यातील ११ वर्ष जुनी मैत्री मार्च २००९ मध्ये जागा वाटपावरून तुटली. तसेच कंदमाल जिल्ह्यातील वादात ३८ ख्रिश्चन नागरिकांचे बळी गेल्यानेही या युतीत दरी पडली. बीजेडी-भाजप यांनी दोन टर्म ओडिशामध्ये पूर्ण केल्या. भाजपच्या फारकतीनंतरही बीजेडीची आणि पटनायक यांची जादू कायम राहिली आणि त्यांनी सत्ता कायम राखली.
नवीन पटनायक यांची स्वच्छ प्रतिमा. साधी राहणी आणि कामसू वृत्ती यांच्यामुळे त्यांनी आपली जागा बळकट करून ठेवली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.