आचारसंहिता शिथील, राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथील झाल्यानंतर आज राज्यमंत्रीमंडळाची पहिली बैठक होत आहे. या बैठकीमध्ये गारपीट ग्रस्तांच्या मदतीबाबत तसंच राणे समितीच्या मराठा आरक्षण अहवालावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 30, 2014, 10:01 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथील झाल्यानंतर आज राज्यमंत्रीमंडळाची पहिली बैठक होत आहे. या बैठकीमध्ये गारपीट ग्रस्तांच्या मदतीबाबत तसंच राणे समितीच्या मराठा आरक्षण अहवालावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
गारपीट ग्रस्तांना आत्तापर्य़ंत 14 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. अजून त्यांना 1500 कोटी रुपये देणे गरजेचे आहे. तसा अहवाल मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे पाठवण्यात आला आहे. यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
तसंच मराठा आरक्षणासंदर्भात नारायण राणे समितीनं सरकारला सादर केलेल्या मराठा आरक्षण अहवालावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. हा अहवाल मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा की नाही यावरही खलबतं होण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.