ऑडीट मतदारसंघाचं : यवतमाळ – वाशिम

ऑडीट मतदारसंघाचं : यवतमाळ – वाशिम

Updated: Apr 4, 2014, 05:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ – वाशिम
राज्याला दोन मुख्यमंत्री देणा-या यवतमाळ जिल्ह्यात प्रारंभीपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले असले, तरी बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती बदलली.
यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ 2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर निर्माण झाला. तत्पूर्वी यवतमाळ व वाशिम हे दोन वेगळे मतदारसंघ होते. यवतमाळ मतदारसंघावर सुरूवातीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व राहिलं.
काँग्रेसच्या या बालेकिल्यात अंतर्गत गटबाजीमुळे 1996, 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पराभवाचा धक्का पचवावा लागला होता. देवराव पाटील आणि त्यांचे पुत्र उत्तमराव पाटील यांनी तब्बल 8 टर्म या मतदारसंघातून खासदारकी भूषवली. 
1996 च्या निवडणुकीत ज्यावेळी काँग्रेसने उत्तमराव पाटील यांची उमेदवारी कापून गुलाम नबी आझाद यांना निवडणुकीत उतरविले त्यावेळी गटबाजी उफाळली. परिणामतः पहिल्यांदा काँग्रेसचा उमेदवार येथून पराभूत झाला. भाजपचे राजाभाऊ ठाकरे गुलाम नबी यांना पराभूत करून विजयी झाले. 
2004च्या निवडणुकीत भाजपच्या हरिभाऊ राठोड यांनी उत्तमरावांना पराभूत केले. तर 2009च्या निवडणुकीपूर्वी लोकसभेतील अणुऊर्जेच्या चर्चेत हरिभाऊंनी भाजपचा पक्षादेश झुगारून काँग्रेसला मतदान केले. काँग्रेसनेही उपकाराची परतफेड म्हणून भाजपमधून हकालपट्टी झालेल्या हरिभाऊ राठोड यांना उमेदवारी दिली आणि पुन्हा उत्तमराव पाटील यांची उमेदवारी कापली.
तेव्हा देखील गटबाजीचा फटका काँग्रेसला बसला आणि शिवसेनेच्या भावना गवळी विजयी झाल्या. 2004च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 3 व सेनेचे 2 आमदार यवतमाळ जिल्ह्यात होते. मात्र 2009च्या निवडणुकीत भाजपचा सफाया झाला. शिवसेनेचे दारव्हा येथील आमदार संजय राठोड हेच आता विरोधक म्हणून एकाकी झुंज देत आहेत.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 6 जागा आहेत. यांपैकी SCसाठी राखीव असलेल्या वाशिममधून भाजपचे लखन मलिक आमदार आहेत. तर वाशिम जिल्ह्यातीलच कारंजाचे आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके कारभार सांभाळतात.
STसाठी राखीव असलेल्या राळेगा विधानसभा जागेवर काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके निवडून आलेत. यवतमाळ विधानसभेचे आमदार निलेश देशमुख-पारवेकर यांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर आमदार म्हणून निवडून आल्या. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसवर शिवसेनेच्या संजय राठोड यांच्या रूपाने भगवा फडकतोय. तर पुसद विधानसभेत राष्ट्रवादीचे मनोहर नाईक आमदार म्हणून निवडून आलेत.
 
गेल्या 5 वर्षात मतदारसंघात शक्ती वाढलीय ती राष्ट्रवादी काँग्रेसची. विधानपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे निकटवर्तीय कंत्राटदार संदीप बाजोरिया यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. ते काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरू लागलेत.
काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी खासदार उत्तमराव पाटील असे दोन गट निर्माण झाले. पुसद मतदारसंघ मनोहर नाईक यांचा गढ असला, तरी जिल्ह्यात इतरत्र राष्ट्रवादीचे अस्तित्व नव्हते. परंतु संदीप बाजोरिया यांनी सर्वप्रथम काँग्रेसला खिंडार पाडून सहावेळा खासदार राहिलेले उत्तमराव पाटील यांना राष्ट्रवादीत आणले.
उत्तमराव यांच्या येण्याने जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आली. जिल्हा परिषदेतही 21 सदस्य निवडून आल्याने राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपशी हातमिळवणी करत, काँग्रेसला बाहेर ठेवले. नगर परिषद आणि पंचायत समित्याही राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या. मात्र उत्तमरावांच्या निधनानंतर सेनेची ताकद वाढली. आणि पहिल्यांदाच सेनेचे 12 सदस्य जिल्हा परिषदेत निवडून आले.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसला एकसंघ ठेवले आहे. माणिकराव यांचे नाव सध्या लोकसभा उमेदवार म्हणून आघाडीवर असले तरी युथ काँग्रेसचा अध्यक्ष असलेला त्यांचा पुत्र राहुल ठाकरे देखील तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माजी खासदार हरिभाऊ राठोड मात्र आपल्यालाच काँग्रेसची उमेदवारी मिळेल असे ठासून सांगत आहे. 
जिल्हा काँग्रेस हरीभाऊंना फारसे महत्व देत नसली तरी जनसंपर्क आणि बंजारा समाजाच्या ताकतीवर ते प्रबळ उमेदवार ठरू शकतात. शिवसेनेमध्ये लोकसभा उमेदवारीसाठी कोणाचाही दावा नाही. परंतु विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी द्यायची नसल्यास माणिकराव ठाकरेंना पराभूत करणारे दारव्ह्याचे आमदार संजय राठोड हे संभाव्य उमेदवार असू शकतात.
यवतमाळ मतदारसंघातील समस्या