ऑडिट मतदारसंघाचं : दक्षिण मुंबई

ऑडिट मतदारसंघाचं : दक्षिण मुंबई

Updated: Apr 4, 2014, 05:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, दक्षिण मुंबई
ज्यांच्या एका इशा-यावर अख्खी मुंबई बंद व्हायची, ते झुंजार कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांना निवडून देणारा हा मतदारसंघ आहे.
दक्षिण मुंबई... गेट वे ऑफ इंडिया अर्थात भारताचं पश्चिमेकडील  प्रवेशद्वार.. ब्रिटीश राजवटीच्या खाणाखूणा पावलोपावली अंगावर बाळगणारा हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग. मुंबईचं नाव ज्यावरुन पडलं, ती मुंबादेवी याच भागांत आहे.
भारताचं आर्थिक केंद्र असलेल्या या मतदारसंघात जगातील आणि देशातील नामवंत कंपन्यांची, बँकांची कार्यालये आहेत.
एवढंच नाही 200 वर्षांपेक्षा जास्त जुनी नौदल गोदी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची मुख्यालये दक्षिण मुंबईची शान आहेत. 
मुंबईची जुनी पण आता पुसत चाललेली ओळख असलेल्या जुन्या चाळी आणि बंद पडलेल्या गिरण्या ही देखील दक्षिण मुंबई मतदारसंघाची खास वैशिष्ट्यं आहेत.
आर्थिक केंद्र असल्यानं 26/11 च्या हल्ल्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी टार्गेट केलं ते दक्षिण मुंबईलाच.
राज्याचा गाडा चालवणारं मंत्रालय, परदेशी नागरिक, उच्चभ्रुंची वस्ती, भारतातील अतिश्रीमंत वर्ग मोठ्या संख्येनं असलेल्या या मतदारसंघात मच्छिमारा-यांच्या वस्त्यांबरोबरच जुन्या चाळी तसेच गरीब आणि मध्यवर्गींय मतदारांची संख्याही मोठी आहे. 
२००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मलबार हिल, कुलाबा, भायखळा, वरळी, शिवडी, मुंबादेवी मिळून दक्षिण मुंबई मतदारसंघ बनला आहे. 
एकेकाळचे काँग्रेसचे मातब्बर, पॉवरफुल नेते सदाशिवराव पाटील ऊर्फ स. का. पाटील आणि झुंजार कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघाचे सध्याचे खासदार आहेत काँग्रेसचे मिलिंद देवरा.
दक्षिण मुंबई मतदारसंघात एकूण 15 लाख 89 हजार 811  मतदार आहेत. यापैकी पुरुष मतदार 9 लाख 4 हजार 733 आहेत तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 85 हजार 78 एवढी आहे.
या मतदारसंघाने कुठल्याच एका पक्षावर कायम विश्वास टाकलेला नाही. १९७७ ला रतनसिंह राजदा भारतीय लोक दल आणि त्यानंतर १९८० ला भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपची या मतदारसंघात कायम रस्सीखेच सुरू राहिली.
१९८४ , १९८९ , १९९१ ला काँग्रेसचे मुरली देवरा, १९९६ ला भाजपच्या जयवंतीबेन मेहता, १९९८ पुन्हा मुरली देवरा, १९९९ ला जयवंतीबेन मेहता आणि त्यानंतर २००४ मध्ये काँग्रेसचे मिलिंद देवरा ह्यांनी या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवून दिला. 2009 मध्ये शिवसेना आणि मनसेच्या मतांची विभागणी मिलिंद देवरांच्या पथ्यावर पडली.
उच्चभ्रु, मध्यवर्गीय आणि झोपडीवासीय अशा सर्व स्तरांतील मतदार इथं राहतात. या मतदारसंघावर कुणा एका पक्षाचं वर्चस्व नाही. त्यामुळं आगामी निवडणुकीत काँग्रेसचे मिलिंद देवरा हॅटट्रिक करणार का, शिवसेना-मनसेतल्या साठमारीचा फायदा कुणाच्या पथ्यावर पडणार, यावर इथली पुढची गणितं अवलंबून आहेत.
 
काँग्रेस नेते मुरली देवरांचे पुत्र अशी पूर्वी ओळख असणा-या खासदार मिलिंद देवरांनी आता स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. माहिती व तंत्रज्ञान आणि नौकायन खात्याचे राज्यमंत्री असलेले मिलिंद देवरा राहुल ब्रिगेडच्या किचन कॅबिनेटमधील खास सदस्य आहेत.
खासदार मिलिंद मुरली देवरा
जन्म - ४ डिसेंबर १९७६
वय -  ३७
शिक्षण -  बीएसस्सी इन बिझिनेस अँडमिनिस्ट्रेशन
काँग्रेसचे मिलिंद देवरा हे कॉस्मोपोलिटन दक्षिण मुंबई मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतायत. काँग्रेसचे युवा नेते म्हणून गणले जाणारे मिलिंद देवरांनी २००४ मध्ये पहिली निवडणूक लढवली ती थेट लोकसभेचीच... पहिल्याच दमात त्यांनी दक्षिण मुंबई आपल्या नावावर केली.
नवख्या मिलिंद देवरांनी भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांचा अवघ्या १० हजार मतांनी पराभव करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले. मनसे विरूद्ध शिवसेना भांडणात मिलिंद देवरांचा लाभ झाला.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांना 2 लाख 72 हजार 411 मते मिळाली, तर बाळा नांदगावकर यांना 1 लाख 59 हजार 729 मते मिळाली.  मनसेच्या बाळा नांदगांवकर यांचा सव्वा लाख मतांनी पराभव करत या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा त्यांनी कायम ठेवला.  
काँग्रेसच्या वरच्या वर्तुळातील नेते आणि गांधी घराण्याच्या जवळचे अशी मुरली देवरांची ओळख आहे. त्यांचा वारसा मिलिंद देवरा यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सक्षमपणे चावला आहे.
दक्षिण मुंबई हीच