www.24taas.com, झी मीडिया, गडचिरोली-चिमूर
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ज्याची 60 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. 2009मध्ये हा मतदारसंघ अनुसुचित म्हणून राखीव झाला आणि राजकीय समीकरणं बदलली.
देशातील सर्वात मागास जिल्ह्यांच्या यादीत अग्रक्रमावर असलेला हा आहे गडचिरोली-चिमूर मतदारसंघ. गडचिरोलीचं केवळ नावं जरी उच्चारलं तरी विदर्भाबाहेरील लोकांच्या अंगावर काटे उभे राहतात. हिंसक नक्षल कारवाया आणि आजही आदिम युगात वावरणारे आदिवासी हे येथील वैशिष्ट्य. इथले आदिवासी हेच विविध राजकीय पक्षांची राजकीय शक्ती.
विदर्भ व आंध्र यांचा संस्कृती संगम असणा-या या भागात मराठी, हिंदी, गोंड, माडिया आणि तेलगू या भाषांचा सर्रासपणे वापर केला जातो.
विदर्भाची `काशी` अशी श्रद्धा असणारे हेमाडपंथी मार्कंडा मंदिर व चिमूर येथील क्रांतीस्थळ या भागातील भावनिक आणि श्रद्धास्थाने. लोकशाहीच्या मार्गाने जाण्याची इच्छा, मात्र नक्षली बंदुकीचा धाक अशा आवर्तात सापडले आहे येथील जनमानस.
वनाच्छादीत, आदिवासी, नक्षलग्रस्त अशी शेलकी विशेषणे लाभलेल्या या टोकावरच्या भागाकडे देशाचंच काय राज्याचंही कायम दुर्लक्ष झालं. वैनगंगा, गोदावरी, गाढवी, पर्लकोटा, इंद्रावती या बारमाही नद्या या परिसरात आहेत. मात्र येथे सिंचन अभावानेच पाहायला मिळतं. मूळ चंद्रपूर जिल्ह्यापासून 1980 साली वेगळ्या झालेल्या या जिल्ह्यात आता कुठे विकासाचे वारे वाहू लागलेत.
हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती अर्थात आदिवासींसाठी राखीव आहे. मात्र या मतदारसंघातली मतदार असलेला आदिवासी देशोधडीला आणि बाहेरचे पाहुणे गलेलठ्ठ झाल्याची स्थिती पाहायला मिळते. गडचिरोली, ब्रह्मपुरी व वडसा अशी 3 मोठी शहरे व उर्वरित ग्रामीण अशी या मतदारसंघाची मांडणी झाली आहे.
गडचिरोली लोकसभा निवडणुकीत एकुण 12 लाख 85 हजार 387 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही 6 लाख 51 हजार 543 होती, तर 6 लाख 33 हजार 844 महिलांनी मतदान केलं. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल आहे.
याशिवाय मतदारांच्या टक्केवारीत 15 टक्के ओबीसी, 50 हजार मुस्लिम, सुमारे 1 लाख तेलगू भाषिक आहेत. निर्वासित बंगाली मतदारांची संख्याही येथे निर्णायक आहे. या क्षेत्रात व्यवसाय व राईस मिल सारखे उद्योग हिंदी भाषिकांच्या हाती असल्याने हिंदी भाषिक मतदारही लक्षणीय संख्येत पाहायला मिळतात.
गडचिरोली-चिमूर लोकसभा म्हणजे काँग्रेससाठी एक प्रयोगशाळा आहे. या मतदारसंघातील आधीच्या खासदारांच्या नावावर एक नजर टाकली तरी हे स्पष्ट होते. कधी नागपूरचा उमेदवार लाद, कधी रिपाईचा पाहुणा आण असे काँग्रेसने केलेले प्रयोग यशस्वी झाले.
या पाहुणेशाहीला कंटाळून भाजपने या मतदारसंघात भक्कम पाय रोवले आणि एक, दोन नव्हे तर तब्बल तीनदा यश मिळविले. 2009 साली हा मतदारसंघ अनुसूचित उमेदवारासाठी घोषित झाल्यानंतर पुन्हा काँग्रेसला यश मिळाले.
गडचिरोली लोकसभा क्षेत्रात 6 विधानसभेच्या जागा आहेत. 6 पैकी 4 जागी काँग्रेसचे आमदार आहेत एका जागेवर भाजप तर एक विधानसभा अपक्षाच्या ताब्यात आहे. एकूण काय काँग्रेससाठी समीकरणांच्या दृष्टीने 5 विरुद्ध 1 अशी कागदावरची सोपी लढत आहे.
गडचिरोली लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यावर जनतेने काँग्रेसला दिलेली पसंती काँग्रेसजनानांच नकोशी झाली आहे. आदिवासी व स्थानिक माणूस म्हणून मारोतराव कोवासेंचा विजय झाला. मात्र त्यापेक्षा पाहुणे बरे होते असे म्हणण्यापर्यंत ही नाराजी पोहचली आहे.
भाजपला नाकारल्यावर मिळालेल्या संधीचा विकासाच्या दृष्टीने वापर करण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. खुद्द राज्याचे गृहमंत्री आर आर आबा हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पण जिल्ह्याचे प्रश्न सोडिवण्यात ते अपयशी ठरले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक लोकप्रतिनिधींची उदासिनता आहे. तर दुसरीकडे अधिका-यांनो नीट काम करा, अन्यथा गडचिरोलीला बदली करण्याची धमकी ठरलेलीच.
गडचिरोली-चिमूरचे काँग्रेसचे शिलेदार म्हणजेच गडचिरोली मतदारसंघाचे विद्यमान खासदार मारोतराव कोवासे यांची ओळख करून घेऊयात.
खासदार कोवासेंची राजकीय ओळख
नाव - मारोती सैनुजी कोवासे
जन्म - 3 नोव्हेंबर 1949
वय - 64 वर्षे
शिक्षण - एम. ए. (राज्यशास्त्र)
काँग्रेसचे मारोतीराव कोवासे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत. कोवासेंचे कुटुंब कट्टर काँग्रेस समर्थक आहे. आजोबा व वडील तत्कालीन कॉंग्रेस श्रेष्ठींच्या मर्जीतले. म्हणूनच उत्तम