ऑडिट मतदारसंघाचं : दिंडोरी

ऑडीट मतदारसंघाचं - दिंडोरी

Updated: Apr 4, 2014, 03:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, दिंडोरी
गेल्या लोकसभेत राज्यातला सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं या मतदारसंघावर विश्वास टाकला. अगदी शरद पवार यांनीही आपल्या भाषणांत याचा उल्लेख करत, बारामतीनंतर याच मतदारसंघाचा दाखला दिला. कारण इथं सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादीचे होते. मात्र असं असतानाही इथल्या मतदारांनी राजकारणातील या जाणत्या राजाच्या पक्षाला धूळ चारली. जाऊया त्या मतदारसंघात.
स्वामी समर्थांचं आध्यात्मिक मुख्य केंद्र आणि गुरुकुल म्हणून दिंडोरीची राज्यभरात ओळख. साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेला वणीचा सप्तश्रृंगीगड याच लोकसभा मतदारसंघात येतो... आधुनिक शेतीचा पुरस्कर्ता असा हा तालुका.. ग्रामपालिका असलेल्या या शहरात जवळपास प्रत्येक बॅँकेचं अस्तित्व आहे.
गेल्या तीन वर्षात इथल्या कष्टकरी शेतक-याने शेततळ्यांचा तालुका म्हणून आपलं नाव केलं आहे. उन्हाळ्यात इथल्या शेतक-याला कुठल्याही आवर्तनाची गरज राहत नाही, इतकं मुबलक पाणी साठवणूक करणारा हा तालुका... राज्याने आदर्श घ्यावा असा हा तालुका आज मुंबईलाच नव्हे तर देशपरदेशात भाजीपाला पुरवतो. 
या लोकसभा मतदारसंघातील निफाड तालुकाही असाच सधन. मात्र सुरगाणा, कळवण आणि पेठ हे आदिवासी बहुल तालुके अद्याप आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत.. गुजरात सीमेला लागून असलेल्या या तालुक्याचा रोजगार केवळ गुजरातेतील शहरांवर अवलंबून आहे.
अनेक आदिवासी लोक रोजीरोटीसाठी स्थलांतरीत होत असतात. सुरगाण्यात स्ट्रॉबेरीच्या पिकामुळं आदिवासी शेतीत रस घेऊ लागलाय. तर पूर्व भागातील येवला नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी शेतीची दुरावस्था आहे. मनमाडमध्ये तर पिण्याच्या पाण्याची गंभीर अवस्था...वीस ते पंचवीस दिवसांनी पाणी मिळणे हे नित्याचंच झालंय. 
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये  14 लाख 32 हजार 938 मतदार होते.... यांपैकी  7 लाख 37 हजार 206 पुरुष मतदार आहेत. तर 6 लाख 95 हजार 732 महिला मतदार आहेत.
पूर्वीच्या मालेगाव मतदारसंघाच्या पुनर्रचनेआधी हा मतदारसंघ जनता दलाचा गड होता. 1957 ला प्रजा समाजवादी पक्षाचे  यादव नारायण जाधव खासदार होते.1962 ला काँग्रेसचे माधव लक्ष्मण जाधव तर 1967 आणि 1971 मध्ये झामरू मंगलू कहांडोळ हे काँग्रेसचे खासदार होते. 1977 ला बीएलडीचे हरिभाऊ महाले खासदार होते.
1980 ला पुन्हा एकदा झामरू मंगलू कहांडोळे यांनी काँग्रेसला मतदारसंघात विजय मिळवून दिला. तर 84 ला कॉंग्रेसचे सीताराम भोये तर 89 हरिभाऊ महाले जनता दलाकडून निवडून आले. 91 मध्ये पुन्हा कहांडोळे खासदार झाले.. 1996 मध्ये भाजपचे कचरू राऊत, 1199 मध्ये
हरिभाऊ महाले निवडून आले.
तर 2004 पासून हरिश्चंद्र चव्हाण इथले खासदार आहेत. मुस्लीम बहुसंख्याक असलेल्या या मतदारसंघात एकेकाळी जहाल नेते निहाल अहमद यांचा बोलबोला होता. नंतर मालेगाव तालुका धुळ्याला जोडला गेल्याने या मतदारसंघाची समीकरणे बदलली. सुरगना आणि पेठ्मध्ये असलेले कम्युनिस्टांचं वर्चस्व आज या मतदारसंघात आहे. एक ते दीड लाख मते कम्युनिस्ट पक्षाला मिळतात. सध्या या मतदारसंघात भाजपचे चव्हाण हे राज्य करतायत.. त्यांची ही दुसरी टर्म आहे. 
लोकसभेची जागा भाजपच्या ताब्यात असली राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात भाजपचा एकही आमदार नाही. दिंडोरीतून शिवसेनेचे धनराज महाले,  निफाडमधून शिवसेनेचे अनिल कदम, कळवणमधून राष्ट्रवादीचे अर्जुन पवार, नांदगावमधून पंकज भुजबळ, येवलामधून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, तर चांदवडमधून आघाडी समर्थक शिरीषकुमार कोतवाल आमदार आहेत..
अनुसुचित जमातीसाठी राखीव या मतदारसंघात दिंडोरी आणि कळवण या दोनच विधानसभा मतदारसंघ आदिवसी बहुल  आहेत. इतर चार मतदारसंघात आदिवासींची टक्केवारी कमी आहेत...त्यामुळे इतर समाजाचे मतदारच या ठिकाणी खासदार ठरविण्यात निर्णायक ठरतात.
कोणत्याही एका पक्षाची पूर्ण सत्ता नसल्यानं ना घर का, ना घाट का, अशी दिंडोरी मतदारसंघाची अवस्था झालीय.. आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात शेतकरी स्वकर्तुत्वाने आपला विकास करतोय... त्याच्या मेहनतीला लोकप्रतीनिधींच्या कार्य कर्तुत्वाची जोड मिळाल्यास मतदारसंघाचा विकास निश्चित आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भापचा एकही आमदार नसताना कमळ कस उगवलं याचा सर्वांनाचं आश्चर्य वाटतं. मात्र ही किमया साधणारे दिंडोरेचे भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची आता ओळख करून घेऊया...
हरीश्चंद्र देवराम चव्हाण यांची ओळख
खासदार – हरीश्चंद्र देवराम चव्हाण
जन्म – २५ डि