ऑडिट मतदारसंघाचं : धुळे

ऑडिट मतदारसंघाचं - धुळे

Updated: Apr 4, 2014, 02:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, धुळे
धुळे लोकसभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ 2009मध्ये सर्वसाधारण म्हणून घोषित झाला. आणि काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या मतदारसंघात भाजपचं कमळ फूललं. चला तर पाहूयात कोणता आहे हा मतदारसंघ? 
आपण आता आहोत खानदेशातील धुळे जिल्ह्यात.. एक दोन नव्हे तर तब्बल तीन महामार्गांवर वसलेलं हे शहर. एकेकाळी नंदुरबार जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार याच जिल्ह्यातून चालत असे, भास्कर वाघ यांचा घोटाळा आणि रॉकेलच्या काळाबाजारामुळे राज्यात प्रकाशझोतात आलेले हे शहर.
अहिराणीचा गोडवा आणि शासकीय अधिका-यांचे देखणे बंगले यासाठी प्रसिद्ध असलेले  धुळे शहर पांझरा नदीच्या काठावर वसलंय. स्वातंत्र्यापूर्वीच सुनियोजित वाहतूक आणि शहरवास्तू नियोजन असलेलं हे छोटेखानी शहर. एकविरा आणि बिजासनी देवी या भागातील प्रमुख कुलदैवत.. नाशिक विभागातील एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय कृषी महाविद्यालय सध्या याच शहरात आहे. 
 
इतिहासातल्या अनेक पाउलखुणा जोपासणारे राजवाडे, वस्तूसंग्रहालय आणि समर्थ वाग्देवता मंदिर  ही धुळ्याची ओळख, नुकतंच उद्घाटन झालेल्या देशातील सर्वात मोठ्या सोलार वीज निर्मिती प्रकल्पाच्या रुपाने धुळ्याला आधुनिक ओळख मिळालीये.. या मतदारसंघात औद्योगिक वसाहत आहे, पण ती नसल्यासारखीच, कुठलाही मोठा उद्योग नसल्यानं रोजगारासाठी पदवीधर तरुण नाशिक, मुंबईचा रस्ता धरतात.
धुळे शहराची अर्थव्यवस्था चाकरमाने आणि व्यापारावर आधारीत आहे. इथं मोठे उद्योग अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत.  जिल्ह्यात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवला गेला आहे.मात्र नियोजनाच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. बागायती शेतीचे प्रमाण फक्त 1813 हेक्टरपुरतं मर्यादित आहे.
2009मध्ये 15 लाख 75 हजार 225 मतदार धुळ्यात होते. त्यात 8 लाख 8 हजार 302 पुरुष मतदार तर 7 लाख 66 हजार 923 महिला मतदार होते.
1991 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व राहिलं. त्यानंतर कधी काँग्रेस, कधी भाजप असा लपंडाव सुरू आहे. 1996मध्ये साहेबराव बागूल यांच्या रुपानं पहिल्यांदा धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा खासदार लोकसभेत गेला.
तर 1998मध्ये डी एस अहिरे यांनी पुन्हा  काँग्रेसला ही जागा मिळवून दिली. त्यानंतर 1999 ला भाजपचे रामदास गावीत तर 2004मध्ये काँग्रेसचे बापू चौरे खासदार राहिले. तर 2009मध्ये प्रतापदादा सोनवणे भाजपच्या तिकिटावर निवडून आले.
मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या या शहरातील राजकीय वातावरण तापू लागलंय. लोकसभा निवडणुकीत युतीला साथ देण्याची मानसिकता आणि कोंग्रेसमधील गटबाजीची परंपरा यंदा खंडित होणार का, हा सध्या इथला चर्चेचा विषय आहे.
 
सिव्हिल इंजिनियरींग केल्यानंतर, नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून 1998 ते 2009पर्यंत आमदारकी मिळवली. त्यानंतर पक्षाने खासदारकीसाठी दाखवलेला विश्वास त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सार्थ केला. चला तर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या या कुटूंबातील खासदाराची ओळख करून घेऊयात.

प्रतापदादा सोनवणे यांची ओळख
 नाव    -- प्रतापदादा  सोनावणे 
 
जन्म  --  22 डिसेंबर 1948
 
वय    –-  64 वर्षे
 
शिक्षण -- बी.ई सिव्हील
नाशिक जिल्ह्यातील मानूर या गावात जन्मलेले प्रतापदादा सोनावणे  नाशिक शहरातील गजबजलेल्या व्यापारी वस्तीत म्हणजेच कॉलेज रोड परिसरात राहतात. विशेष म्हणजे नाशिकमध्ये राहूनच ते धुळ्याचा कारभार हाकतात. कारण आज ते धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
मराठा समाजाचे सोनवणे 1998 ते 2009 पर्यंत नाशिक शिक्षक मतदारसंघातून आमदार झाले. प्रत्येक शाळेत संगणक देत त्यांनी या काळात सर्व शाळांना संगणक साक्षर केले. आमदार निधीतून पुस्तके देण्याची तरतूद या काळात नव्हती. त्यासाठी त्यांनी रेटा लावला. लायब्ररी देण्याचा सपाटा त्यांनी लावला. केलेल्या कामाच्या बळावर  धुळ्यातून आपले नशीब आजमावीत पंधराव्या लोकसभेत ते खासदारही झाले.
राजकारण आले की हितशत्रू निर्माण होतात.. मात्र प्रताप सोनवणे हे अजातशत्रू आहेत. सर्वच पक्षात त्यांचे मित्र आहेत. परंतू लोकसभेतील कामगिरी फारशी उल्लेखनीय राहिलेली नाही.
साठीच्या वयात गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वीस हजाराचे मताधिक्य मिळवत धुळ्यातून विजय मिळविला. शिरपूरचे कॉंग्रेसचे धनाढ्य आणि मातब्बर उमेदवार अमरीशभाई पटेल यांना त्यांनी धूळ चारली.
गेल्या वीस वर्षापासून राजकारणात असूनही सोनावणे यांच्यावर को