www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग
रत्नागिरी-सिंधुदुर्गातल्या वादावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या आदेशांचं पालन करावं असा दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय. सिंधुदुर्गात झालेल्या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना दम दिलाय.
काँग्रेसचे नीलेश राणेंचा प्रचार करणार नाही असा राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर आणि पदाधिका-यांचा पवित्रा आहे. त्यासंदर्भात अजित पवार, त्यानंतर कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाडांनी केसरकर आणि पदाधिका-यांची भेट घेतली. मात्र तरीदेखील पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यानंतर अजित पवार भडकलेत. त्यांनी दमबाजी केली.
अजित पवार यांच्या सभेलाही दीपक केसरकरांसहीत अनेक पदाधिका-यांनी दांडी मारली होती. त्यानंतर केसरकरांनी आज शरद पवारांची भेट घेतली. दरम्यान नारायण राणेंनी राष्ट्रवादीशी चर्चेची तयारी दाखवलीय. तसंच राष्ट्रवादीनं काँग्रेससारखाच आघाडीचा धर्म पाळावा, असं आवाहनही त्यांनी केलंय. त्यामुळे आता सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.