www.24taas.com झी मीडिया, जळगाव
आतापर्यंत आपण लाकडावर, दगडावर , सुपारीवर कोरीव काम करून गणपतीची मूर्ती साकारताना कलाकारांना पाहिल आहे. मात्र आता फणायावर लिहिल्या जाणाऱअया खडूवरदेखील बाप्पाची मूर्ती साकारण्याचा अविष्कार अवलिया मूर्तीकाराने साकराला आहे.
खडूवर साकारलेली या बाप्पांच रूंप अतिशय मनमोहक असं आहे. जळगवाच्या जगदीश चव्हाण यांनी बाप्पांची ही मनमोहक रूंप साकारली आहेत. कानळदा गावचे रहिवशी असलेल्या चव्हाण यांनी केवळ अकरावीपर्यंत शिक्षण घेतलंय. मात्र त्यांचं मूर्तीकौशल्य हे एखाद्या पदवीधारक कलाकारालाही लाजवणारं आहे. खडूवर विराजान असलेल्या बाप्पाच्या सात ते आठ मूर्ती त्यांनी साकारल्या आहेत. त्यांचे हे मूर्ती कौशल्य सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला आहे.
चव्हाण यांनी वेगवेळ्या राष्ट्रपुरुषांचे मुखवटेही ही खडूवर कोरले आहेत. कल्पकतेला शिक्षणाच्या चौकटीत बसवाता येत नाही. जगदीश चव्हाण यांनी भरवलेल्या प्रदर्शनाला मिळवत असलेल्या प्रतिसादावरुन हेच स्पष्ट झालं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडीओ