साहित्य: 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, मैदा, तूप, रिफाइंड तेल (तळण्यासाठी).
कृती: तूप, दूध व साखर एकत्र करून साखर विरघळेपर्यंत गरम करावे. हे मिश्रण गार करून त्यात मावेल एवढा मैदा मिसळून पीठ मळून गोळा बनवावा. हा गोळा चांगला कुटून मऊसर बनवावा.
पिठाच्य गोळ्या बनवून जाडसर पोळ्या लाटाव्यात, कातणाने मध्यम आकाराचे शंकरपाळे कापावेत (कडा कापून टाकाव्यात). गरम रिफाइंड तेलात एक एक वेगळा करून शंकरपाळे तळावेत. फुलून वर आलेले शंकरपाळे एकदा उलटून मंद गॅसवर खमंग, सोनेरी रंगावर तळावे.