बदाम खीर

मिक्सरवर २ बदामांची सालासकट पूड करा. २० बदाम गरम पाण्यात भिजत घाला. एक तासानंतर बदाम सोला. नंतर मिक्सरवर सोललेल्या बदामाची बारीक पूड करा.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 5, 2012, 07:51 PM IST

www.24taas.com
जिन्नस :
• बदाम २२
• साखर १० चमचे
• साजूक तूप १ चमचा
• दूध अडीच कप
मार्गदर्शन :
मिक्सरवर २ बदामांची सालासकट पूड करा. २० बदाम गरम पाण्यात भिजत घाला. एक तासानंतर बदाम सोला. नंतर मिक्सरवर सोललेल्या बदामाची बारीक पूड करा.
मंद आंचेवर कढई तापत ठेवा. नंतर त्यात साजूक तूप व बदामाची बारीक केलेली पूड घाला व हे मिश्रण कालथ्याने परतून घ्या. नंतर त्यात दूध व साखर घालून ढवळत रहा. आता आंच मध्यम करा.
दूध थोडे आटले की गॅस बंद करा. बदामाची खीर प्यायला देताना त्यावर थोडी सालासकट केलेली बदामाची पूड पेरून द्या. ही खीर चविष्ट व पौष्टिक आहे.