गणेशोत्सवासाठी जड वाहनांना बंदी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि गतीशील होण्याकरिता १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत रात्रीच्या वेळेस अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीस बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव पोलिसांकडून शासनास पाठवण्यात आला आहे. याआधी जड वाहनांना, अशी बंदी घालण्यात आली होती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 11, 2012, 04:58 PM IST

www.24taas.com,मुंबई
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि गतीशील होण्याकरिता १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत रात्रीच्या वेळेस अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीस बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव पोलिसांकडून शासनास पाठवण्यात आला आहे. याआधी जड वाहनांना, अशी बंदी घालण्यात आली होती.
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवासात कोणतीही अडचण होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. वाहतूक पोलीस बंदोबस्ताबरोबरच औषध, रुग्णवाहिका, क्रेन आदी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.गणेशोत्सवासाठी एस.टी., लक्झरी बस, खासगी वाहनांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जातात. अरुंद महामार्ग त्यात जादा गाड्या कोकणाकडे एकाच वेळेस निघत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे खबरदारी घेण्यात आली आहे.
महामार्गावर पोलीस बंदोबस्त
महामार्ग पोलीस विभागाकडून दोन पोलीस अधीक्षक, दोन पोलीस उप अधीक्षक, सात पोलीस निरीक्षक, ५० पोलीस महानिरीक्षक-उपनिरीक्षक, ४४७ कर्मचारी असा विशेष बंदोबस्त नेमण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याचा पोलीस फौजफाटा तैनात असणार आहे.
मदतीसाठी कोठे संपर्क कराल
प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास मदतीकरिता पुढील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ९८३३४-९८३३४, ९८६७५-९८६७५. एसएमएस मोबाईल क्रमांक-९५०३२१११००, ९५०३५१११००.
पर्यायी मार्ग
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार्‍या भाविकांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यारी मार्ग असे. रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे- सातारा-उंब्रज- मल्हार पेठ- कोयना नगर - चिपळूण., मुंबई-पुणे एक्सप्रेस वे- कराड- आंबा घाट-साखरपा- पाली- हातखंबा- रत्नागिरी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी मुंबई- पुणे एक्सप्रेस वे- कोल्हापूर-गगनबावडा-वैभववाडी- कणकवली., मुंबई- पुणे एक्सप्रेस वे- कोल्हापूर- गडहिंग्लज- आजरा- आंबोली घाट- सांवतवाडी., मुंबई- पुणे एक्सप्रेस वे- कोल्हापूर- राशिवडे- राधानगरी- दाजीपूर- फोंडा- नांदगाव- कणकवली.