फिक्सिंग: काही खेळाडू, टीमही सहभागी- नीरज कुमार

आयपीएल फि्क्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती आणखी महत्त्वाची माहिती आली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी काल स्पष्ट केले.

Updated: May 24, 2013, 11:09 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल फि्क्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती आणखी महत्त्वाची माहिती आली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी काल स्पष्ट केले की, फिक्सिंगमध्ये आणखी काही खेळाडूचे नावं समोर येऊ शकतो. त्यांनी सांगितलं की, स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणखी काही पुरावे हाती लागले आहे.
फिक्सिंग प्रकरणात आणखी काही खेळाडू आणि टीम पोलिसांच्या रडारावर असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांकडे आणखी काही पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे फिक्सिंगमध्ये आणखी काही खेळाडूंची नावेही असल्याचेही समोर येण्याची शक्यता आहे. इतर टीमही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. नीरज कुमार यांनी गुरवारीही खुलासा केला की, स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणखी तीन खेळाडू आहेत.
हे खेळाडू तीन वेगवेगळ्या मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये असण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्सचे श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेलिया यांना अटक केली आहे. त्यांच्याव्यतिरिक्त आणखी तीन खेळाडू या फिक्सिंग प्रकरणात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.