शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची जामिनावर सुटका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर लगेचच पवार काका-पुतण्यांना टार्गेट केलं. ऊसदर आंदोलन पवार काका-पुतण्यांनी पेटवल्याचा आरोप सदभाऊंनी केलाय. राजू शेट्टींवर जातीयवादी टीका केल्यानं पवारांचे खरे रुप समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 14, 2012, 01:25 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर लगेचच पवार काका-पुतण्यांना टार्गेट केलं. ऊसदर आंदोलन पवार काका-पुतण्यांनी पेटवल्याचा आरोप सदभाऊंनी केलाय. राजू शेट्टींवर जातीयवादी टीका केल्यानं पवारांचे खरे रुप समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय.
इंदापूर कोर्टानं त्यांचा जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची सुटका झालीय. ऊसदर आंदोलनप्रकरणी त्यांना अटक झाली होती. तसंच खासदार राजू शेट्टी यांनीही जामिनासाठी अर्ज दाखल केला असून उद्या त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.
ऊसदर प्रश्नावरुन सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटत आहेत. आंदोलकांनी पंढरपूरजवळ बस फोडली. ऊसाला तीन हजार रुपये भाव हवा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना घेराव घातला. सोलापूर-सातारा मार्गावर शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते जमले होते. आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली.