ऊस पेटला, पोलिसांची जीपच पेटवली

ऊस दरवाढीसाठी करण्यात आलेले आंदोलन अधिकच पेटत आहे. आज कोल्हापूर जवळील दिंडनेर्ली फाट्याजवळ पोलिसांची जीप आंदोलनकर्त्या जमावाने पेटविली. त्यामुळे ऊस आंदोलन भडकण्याची परिस्थितीवरून शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सुरू करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा काही तासाच बंद करण्यात आलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 14, 2012, 12:34 PM IST

www.24taas.com,कोल्हापूर
ऊस दरवाढीसाठी करण्यात आलेले आंदोलन अधिकच पेटत आहे. आज कोल्हापूर जवळील दिंडनेर्ली फाट्याजवळ पोलिसांची जीप आंदोलनकर्त्या जमावाने पेटविली. त्यामुळे ऊस आंदोलन भडकण्याची परिस्थितीवरून शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सुरू करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा काही तासाच बंद करण्यात आलीय.
ऊसला ३००० रूपये दर देण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय आहे. याप्रकरणी स्वाभिमानी संघटना आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. तसेच पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे खा. शेट्टी यांना अटक करून जेलमध्ये टाकल्याने कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले आहेत. त्यामुळे आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या कायम ठेवला आहे.
एसटीला टार्गेट केल्याने कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात आंदोलनामुळे एसटी सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे कोट्यवधीचे एसटीचे नुकसान झाले. आज सकाळी एसटी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, जमावाने पोलिसांची गाडी जाळल्याने पुन्हा एसटी सेबा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या आंदोलनाचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे.
आंदोलनकर्ते आजही रस्तावर असल्याने परिसरात तणाव कायम आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीचे प्रकार सुरू असल्याने तणावाची परिस्थिती आहे. तर कोल्हापुरता कृषीमंत्री शरद पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. तर सांगलीत एसटीला टार्गेट करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.