शंभरीतले तरुण

मुंबई मॅरेथॉनमध्ये एक वयोवृद्ध माणूस धावत होता..102 वर्षाचा माणूस धावत असतानाच सगळ्यांची नजर त्याच्यावर टिकूनच होती. धावणा-या या वेगाला पाहून तरुण ही थक्क झाले. सलमान आणि जॉन अब्राहमपेक्षाही दुपट्टीनं जास्त वय असणा-या या नौजवानाने आपल्या धावण्याने अनेक गोष्टीचे कुतुहल वाढवलं..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 24, 2013, 11:49 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई मॅरेथॉनमध्ये एक वयोवृद्ध माणूस धावत होता..102 वर्षाचा माणूस धावत असतानाच सगळ्यांची नजर त्याच्यावर टिकूनच होती. धावणा-या या वेगाला पाहून तरुण ही थक्क झाले. सलमान आणि जॉन अब्राहमपेक्षाही दुपट्टीनं जास्त वय असणा-या या नौजवानाने आपल्या धावण्याने अनेक गोष्टीचे कुतुहल वाढवलं..केवळ फौजाच नाही तर कोलकात्याचे मनोहर, गुवाहाटीचे भोलादास, किवा भोपाळच्या जीनत बी असो.. या सगळ्याना पाहिल्यावर प्रश्न पडतो, की शंभरी पार केल्यानंतरही हा उत्साह त्यांच्यामध्ये नेमका आला कुठून आणि काय आहे रहस्य या वेगवान चिरतारुण्याचे...
वयाची शंभरी पार केलेले फौजा सिंह... ज्यानी आपल्या फिटनेसमध्ये तरुणांनीही मागे टाकलंय.. मॅरेथॉन मध्ये 42 किलोमीटर स्पर्धेत फौजा सिंह यांनी विश्वविक्रम नोंदवलाय.. मुंबई मॅरेथॉनमध्ये जेव्हा फौजा सिंह यांना धावताना सा-या जगानं पाहिलं, तेव्हा या शंभरी पार केलेल्या या तरुणाच्या उत्साह आणि हिम्मतीला मोठमोठ्या स्टार्सनीही सलाम केला..
कोलकत्तामधील मनोहर 1952 मध्ये भारताचे पहिले बॉडी बिल्डर मिस्टर युनिवर्स बनले होते. आणि वयाची 100 पार झाल्यानंतरही त्यांचे बॉडी बिल्डींगचे किस्से अजुनही प्रसिद्ध आहे.. 105 व्या वर्षातही ते कोलकत्ता मधील अनेक आखाडे असू दे, जीम वा नवीन व्यायामपटूना घडवणे असो... मनोहर नेहमीच आघाडीवर असतात. मोठमोठ्या आखाड्यात व्यायामपटूना अस्मान दाखवणारे कोलकत्याचे मनोहर आता आपल्या वयावर विजय मिळवत आहेत. यांना आता काय म्हणायचे शंभरी पार केलेले वयोवृद्ध की अवघं 100 वर्ष वय असलेला चिरतरुण..
गुवाहाटी मधील भोलादास यानी वयाच्या 100 व्या वर्षी पीचडी मिळवली आणि अवघी दुनिया थक्क झाली.. आज अनेक तरुणाची डॉक्टरी मिळवताना दमछाक होत असताना भोलादास यांनी वयाच्या शंभरीत शारीरीक आणि मानसिक संतुलनही व्यवस्थित सांभाळलय..
केवळ देशातूनच नाही तर विदेशातूनही लोक हैदराबादला मुद्दाम भेट देतात.. त्यांना जाणून घ्यायचं असत की 105 वर्षाचे आयएएस असलेले नारायण चेट्टी या वयातही स्वताला तंदुरुस्त ठेवलय..
भोपाळच्या जीनत बीना पाहिल्यावर लोक त्यांचे वय पाहून हैराण होतात. पण सगळ्यात संभ्रमात टाकते ते त्याचं 112 वर्ष असणारं वय आणि तंदुरुस्ती... जीनत बी आजही आपली सगळी काम आपणच करते. आणि जेव्हा बोलायला सुरुवात करते तेव्हा भल्याभल्यांची छुट्टी करतात...
या चेह-यांना पाहिल्यावर आपल्यालाही प्रश्न पडेल की हे खरच शंभरी पार केलेले वृद्ध आहेत की शंभरी ल्यालेले तरुण... प्रश्न हा ही निर्माण होतो की, या सगळ्यांनी आपल्या आयुष्यात असं नेमक काय केलय की ज्यामुळे त्यानी शंभरी सहज पार केलीय.. आणि म्हणुनच आज हे बुजुर्ग आज तरुणांना आव्हान देत आहेत..
या सगळ्यांची वानगीदाखल उदाहरणं जगण्याची उमेद समृद्ध करुन गेली. पण या प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे.. आणि या प्रत्येक कहाणीत आपल्याला शोधायचाय एक आशावाद...आपण आपल्या दररोजच्या जगण्यात व्यस्त असतो. व्यायाम करा किवा शाकाहार करुनही शंभरी गाठूच याची खात्री नसतो.. एवढं आय़ुष्य तणावांनी भरलंय. म्हणूनच अशा वेळी वयाची 100 पार केलेले आणि लोकांचे रोल मॉडेल बनलेले फौजा सिंह यांनी आपल्या वयाच जपलेले रहस्य हे अतिशय महत्वाचे ठरतंय..
ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि आता भारतात.. जगातला असा कोणताही देश नाही जिथं फौजा सिहांचे नाव आणि त्यांचा वयातला जोश पोहोचला नाही असं नाही. यांना धावताना ज्यावेळी अवघ्या जगान पाहिलं तेव्हा बुजुर्गच नाही तर तरुण मंडळीही त्यांना आपला आदर्श मानू लागली आहेत. त्याचा धावतानाचा आवेश, जोश आणि उत्साह साऱ्यांनाच थक्क करुन गेलाय. मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणारे फौजा सिंह ज्यावेळी व्यासपीठावर आले, तेव्हा आजच्या पिढीच्या आयकॉन असणा-या बॉलीवुड स्टारनीही फौजा सिहंच खरे स्टार असल्याचं म्हणत त्या जिद्दीला सलाम केला. या स्पर्धेतल्या अनेक तरुण स्पर्धकांनीही फौजा सिहांचा या वयातला आवेश पाहत त्यांना आपलं गुरु मानलं. स्पर्धा किती मैलांची असो या फौजा सिंह यांचा स्पर्धा सुरु होण्यापूर्वीपासून ते स्पर्धा संपेपर्यत आवेश आणि जिद्द काही संपत नाही..
फौजा सिंह यांच्या म्हणण्यानुसार वाढत्या वयाबरोबरच अनेक लोक आपल्या स्वास्थ्याबाबत हलगर्जीपणा दाखवतात.. कारण अनेकजण आपल्या खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयीवर ठाम नसतात..
फौजा सिहं यांच्या म्हणण्यानुसार ते स्वतः अजुनही फक्त घरचंच खाणं खातात. फौजा भलेही आज इंग्लडमध्ये राहत असतील. पण परदेशात गेल्यावरही त्यानी आपलं साधं आणि घरगुती जेवणाची सवय कायम ठेवली