www.24taas.com, मुंबई
महिला किती असुरक्षित आहेत हे कांदिवलीत घडलेल्या घटनेवरुन तुमच्या लक्षात येईल...एका तरुणाने घरात घुसुन एका विवाहित महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला....काही दिवसांपूर्वी त्या पीडित महिलेशी त्या तरुणाचं भांडण झालं होतं आणि त्यातूनच हा प्रकार घ़डल्याचं बोललं जातंय...
मुंबईच्या कांदीवली परिसरात सचिन सिंगवन नावाच्या या तरुणाने मंगळवारी सकाळी एका विवाहित महिलेच्या घरात घुसून तिला जाळण्याचा प्रयत्न केला...या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झालीय..तर पीडित महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात तिची मैत्रीण भाजलीय...महिलेवर हल्ला केल्यानंतर आरोपी पोलिसांना शरण आला...आरोपीच्या हल्ल्यात भाजलेल्या दोन्ही महिलांना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलंय...पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सचिनशी पीडित महिलेच्या कुटुंबाचं नुकतचं भांडण झालं होतं..त्याचा सू़ड घेण्यासाठी आरोपीने हे क़ृत्य केलं...
गेल्या काही दिवसांपासून आरोपी सचिन हा पीडित महिलेला त्रास देत असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय..चार महिन्य़ापूर्वी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याता आली होती..पण त्यावर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही..पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती असा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केलाय.
विवाहित महिलेवर ज्वलनशील पदार्थ फेकणा-या सचिनने यापूर्वीही परिसरातील काही तरुणींची छेड काढल्याचं बोललं जातंय..पोलीस दप्तरी त्याच्या या कृष्णकृत्याची नोंद आहे...पण प्रत्येकवेळी पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे आरोपीचं मनोधौर्य वाढलं आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. गेल्या काही महिन्यात खून आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झालीय...त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय...
वांद्रे
इथं स्पॅनिश तरुणीवर बलात्कार
मालाड
वृद्धेची हत्या
वडाळा
पल्लवी पुरकायस्थचाखून
गेल्या काही दिवसात घडलेल्या या घटनांवर नजर टाकल्यास मायानगरी मुंबईत महिला सुरक्षित नसल्याचं पहायला मिळतंय...खून... बलात्कार, विनयभंग, लूट अशा घटनांमध्ये वाढ झालीय..... गुन्हेगारांच्या दृष्टीने महिला य़ा सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे त्यांना सावज केलं जातंय...
12 ऑगस्ट 2012
पल्लवी पुरकायस्थची हत्या
19 ऑगस्ट 2012
सांताक्रुझमध्ये महिलेचा मृतदेह सापडला
8 सप्टेंबर 2012
दक्षा दफ्तरीचा घाटकोपरमध्ये खून
2 नोव्हेंबर 2012
गुजरातहून आलेल्या महिलेचं अपहरण करुन हत्या
6 नोव्हेंबर 2012
मालाडमध्ये वृद्धेचा खून
6 नोव्हेंबर 2012
स्पॅनिश तरुणीवर बलात्कार
या सगळ्या घटना पहाता मुंबईत गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशतच उरलेली नाही असं म्हटलं तर वावगं ठरु नये...एकीकडं गुन्हेगारांकडून महिला टार्गेट केलं जात असतांना मुंबई पोलीस मात्र बेफिकीर असल्याचं पहायला मिळतंय...मुंबईत कामानिमित्त घराबाहेर पडणा-या महिलांची संख्या मोठी आहे...रात्री उशिरापर्यंत त्यांना लोकल किंवा बसने प्रवास करावा लागतो...अशा परिस्थितीत वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे महिलावर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे..
एकेकाळी मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जात असे...पण आता मुंबईत जी परिस्थिती निर्माण झालीय ती पहाता गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला नाही...दिवसेंदिवस महिलांविषयीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्यामुळे महिलांमध्ये चिंता वाढलीय.
कधी लग्नाला नकार दिला म्हणून तर कधी प्रेमाला प्रतिसाद दिला नाही म्हणून मुलींना त्रास सहन करावा लागतो..पण कधी कधी तर ते त्यांच्या जिवावर बेतत.. गेल्यावर्षभरात मुंबईत अशा अनेक घटना घडल्या आहेत...
फिजिओथेरिपिस्ट आर्यंका होजबेटकरवर विषारी रसायन फेकल्याप्रकरणी जेरिट जॉन या फिल्म प्रॉड्युसरला नालासोपारा पोलिसांनी अटक केली होती..पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटनेच्या दिवशी जेरिट जॉन मुंबईच्या वरळी परिसरात राहणा-य़ा आर्यंकाच्या घरी गेला आणि तिच्यावर घातक रसायन फेकून फरार झाला..जेरीटचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची खबर आर्यंकाला लागली होती त्यामुळे तिने जेरिटशी असलेले संबंध तो़डला होते...आर्यंकांनी संबंध तो़डल्यामुळे जेरिट खवळला आणि त्यातूनच त्याने ते भयंकर कृत्य केलं.
या वर्षाच्या सुरुवातीला गोरेगाव रेल्वे स्टेशनवर अशीच एक घटना घडली होती.. पिंटू शेख नावाच्या सैतानाने आरती ठाकूर नावाच्या मुलीवर एसिड फेकल होतं..आरतीच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंटूचं आरतीवर एकतर्फी प्रेम होतं...त्