रिव्ह्यू : रमय्या वस्तावय्या

अॅक्शनपट चित्रपटांच्या मालिकेला खंड देत प्रभुदेवा याचा रमय्या वस्तावय्या हा रोमँटिक चित्रपट १९ जुलैला रिलीज झालाय.

Updated: Jul 24, 2013, 11:12 AM IST

www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
अॅक्शनपट चित्रपटांच्या मालिकेला खंड देत प्रभुदेवा याचा रमय्या वस्तावय्या हा रोमँटिक चित्रपट १९ जुलैला रिलीज झालाय. हा चित्रपट त्यांच्या तेलगु चित्रपटाचा रिमेक आहे. गिरीश कुमार आणि श्रुति हसन यांसारखे नवखे कलाकारांना घेऊन प्रभुदेवा यांनी हा चित्रपट बनवलाय. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला मैने प्यार किया याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
कथानक
एका छोट्याशा गावात राहणारा रघुवीर(सोनू सूद) त्याची बहिण सोना(श्रुति हसन) हिच्यावर जीवापाड प्रेम असते.आईच्या मृत्यूनंतर रघुवीरच तिचा सांभाळ करतो. एक दिवस सोना तिच्या खास मैत्रिणीच्या लग्नाला तिच्या गावी जाते. तिथे तिची ओळख ऑस्ट्रेलियाहून आलेल्या राम (गिरीश कुमार)याच्याशी होते. लग्नाच्या वेळी सोना आणि रामचे बऱ्याच वेळेला एकमेकांशी खटके उडतात. परंतु या छोट्या मोठ्या भांडणादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. जेव्हा राम आणि सोना यांचे प्रेमप्रकरण रामच्या आईला समजते तेव्हा ती सोनाला बरेच चांगले वाईट बोल लावते. याचवेळी रघुवीर तेथे येतो. रामच्या आईकडून अपमानित झाल्यावर दोघेगही बहिणभाऊ गावाला निघून जातात. परंतु सोनाच्या प्रेमाच्या ओढीने राम सोनाच्या गावी पोहोचतो. त्यानंतर आपल्या प्रेमाला सिद्ध करण्यासाठी रघुवीरच्या बऱ्याच परीक्षांना त्याला तोंड द्यावे लागते. त्यात तो खरा होतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.
अभिनय
गावची साधी भोळी मुलीची व्यक्तिरेखा साकारण्यात श्रुती हसनवला यश आलंय. गिरीश कुमार हा नवखा कलाकार असल्याने त्याचा नवखेपणा या चित्रपटात जाणवतो.
दिग्दर्शन
प्रभुदेवा यांनी आपल्या अॅक्शनपट या इमेजला दूर सारत एक नवी कलाक़ृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. कथा आणि व्यक्तिरेखा यांच्यात जरी नवखेपणा नसला तरी कथेचा प्रवाह सतत वाहवता ठेवलाय.
संगीत
सचिन आणि जिगर यांनी फारच सुंदर संगीत दिलंय. तरुणाईला आवडतील अशीही काही गाणी या चित्रपटात आहे.

का पाहावा चित्रपट
साधी सरळ प्रेमकहाणी आहे. श्रुती हसन आणि सोनू सूद यांचा अभिनय बघण्यासारखा आहे. बाकी नावीन्य असे काही नाही
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.