www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पोलीस तुमच्या दारी नवा संकल्प. एक फोन आणि मुंबई पोलीस तुमच्या दारात हजर. ही नवीन पोलीस आयुक्तांची नवीन संकल्पना आहे. सामान्य लोकांच्या सुरक्षितेसाठी.
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सुत्रं हाती घेतल्यावर राकेश मारिया यांनी एक नवी संकल्पना राबवलीय. पोलीस तुमच्या दारी या नव्या संकल्पनेअंतर्गत महिला, लहान मुलं आणि वृद्धांना सुरक्षा देण्याचा राकेश मारिया यांनी प्रयत्न आहे.
वाद आरोप राजकारण अशी अडथळ्यांची शर्यत पार करत राकेश मारिया यांनी मुंबई पोलीस आयु्क्तपद मिळवलं. आता मुंबईची सुरक्षा हेच त्यांच्यासमोर मुख्य आव्हान आहे. आयुक्तपद मिळवल्यावर मारियांनी पहिली घोषणा केली ती महिला, लहान मुलं, आणि वृद्धांना सुरक्षा पुरवण्याची. यासाठी पोलीस तुमच्या दारी ही संकल्पना मारियांनी राबवलीय.
तक्रार सोडवण्यास पोलीस अपयशी ठरले तर तुम्ही थेट पोलीस आयुक्तांनाच त्याची तक्रार करू शकता. अर्थात या संकल्पनेचा गैरवापर केला तर तुम्हालाही कारवाईला सामोरं जावं लागेल. महिला, लहान मुलं, वृद्ध यांना जास्तीत जास्त सुरक्षा पुरवण्यासाठी मुंबईतल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.