मृत्यूचं उड्डाण...

आकाशात घडला तो थरार! काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! हवेत झाली दोन हेलिकॉप्टर्सची टक्कर! काही मिनिटात जळून खाक झाले हेलिकॉप्टर| भारतीय वायुसेनेच्या इतिहासातील धक्कादायक घटना!

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 30, 2012, 11:01 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
आकाशात घडला तो थरार!
काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं!
हवेत झाली दोन हेलिकॉप्टर्सची टक्कर!
काही मिनिटात जळून खाक झाले हेलिकॉप्टर|
भारतीय वायुसेनेच्या इतिहासातील धक्कादायक घटना!
अवघ्या आठ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं!
दहा फूट उंचीवर हादरुन टाकणारं दृष्य!
हेलिकॉप्टर आदळलं जमिनीवर!
जमिनीवर आदळल्यावर उलटलं हेलिकॉप्टर!
हेलिकॉप्टरचे झाले तीन तुकडे!
कसा झाला हा अपघात?
या हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं?
आकाशातील त्या थराराचा प्रत्यक क्षण!

गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसात एकापाठोपाठ एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत प्रवासी बचावले मात्र दुसऱ्या दुर्घटनेतील तेवढे नशिबवान ठरले नाही. गुजरातच्या जामनगरमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेवर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट.
गुजरातच्या जामनगर परिसर... वायुसेनेचे दोन हेलिकॉप्टर एका दुर्घटनेत अक्षरशा भस्मसात झाले... हे दोन्ही हेलिकॉप्टर एमआय-१७ बनावटीची असून त्यांची हवेत टक्कर झाली आणि त्यानंतर हेलिकॉप्टर्सनी पेट घेतला. अवघ्या काही क्षणात हेलिकॉप्टर्सचं रुपांतर राखेत झालं. त्या हेलिकॉप्टरमध्ये दहा जण असल्याची माहिती मिळतेय. दोन हेलिकॉप्टर्समध्ये टक्कर कशी झाली? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. एमआय १७ हे हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेतील एक अत्यंत महत्त्वाचं आणि खात्री लायक असं हेलिकॉप्टर मानलं जातंय. गुजरातच्या सरमत गावाच्या हद्दीत या दोन्ही हेलिकॉप्टर्सचे जळते सांगाडे आढळून आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ बचाव कार्य सुरु केलं. तसेच अग्नीशामन दल, स्थानिक पोलीस आणि वायुसेनेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पण मदत पोहोचण्यापूर्वीच नऊ जणांना मृत्यूने कवटाळलं होतं. ही दुर्घटना वायुसेनेच्या इतिहासातील मोठी घटना मानली जातेय. वायुसेनेचे दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. ही दुर्घटना का घडली याचा शोध घेण्याचा प्रयत्न वायुसेनेच्या तज्ञांकडून केला जात आहे.

आसाराम बापूंच्या हेलिकॉप्टरचा अपघात
गुजरातच्या गोध्रामध्ये बुधवारीही एक दुर्घटना घडली होती. हवेत उडत असलेलं हेलिकॉप्टर पंख कापलेल्या पक्षा प्रमाणे जमिनीवर येवून आदळलं आणि त्यानंतर त्याचे तीन तुकडे झाले. आकाशात उडणारं हे हेलिकॉप्टर जो पर्यंत हवेत उडत होत तो पर्यंत या परिसरातील लोक मोठ्या उत्सुकतेनं त्याच्याकडं एकटक बघत होते. हेलिकॉप्टरकडं आशाळभूत नजरेनं पहाणारी ही गर्दी होती भक्तांची. कारण हेलिकॉप्टरमध्ये होते खुद्द आसाराम बापू… दोन दिवसीय सत्संग कार्यक्रमासाठी आसाराम बापू हेलिकॉप्टरने गोध्रात आले होते. त्यांचं हेलिकॉप्टर काही क्षणातच हेलिपॅडवर उतरणार होतं. आसाराम बापूंच्या दर्शनासाठी त्यांचे अनुयायी मोठे उत्सुक होते. कारण हेलिकॉप्टर जमिनीपासून अवघे काही फूट उंचीवर होतं. पण पुढे असं काही होईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. काही क्षणात सगळं चित्रच बदलून गेलं. तिथ जमलेल्या प्रत्येकाने श्वास रोखून धरला होता. काही स्तब्ध झाले होते. तर काही जीवाच्या आकांताने हेलिपॅडकडे धावत सुटले होते. कारण तिथली परिस्थितीत तशी होती. सगळीकडं एकच गोंधळ उडाला होता. हेलिकॉप्टर जमिनीवर आदळल्यानंतर त्यामध्ये बसलेल्या आसाराम बापूंसह पाच जणांचं काय झालं असेल? हेलिकॉप्टरचं काय झाले असेल? याची चिंता प्रत्येकाला सतावत होती. गोध्राच्या सायन्स कॉलेज ग्राऊंडवर उपस्थित असलेला प्रत्येक जण अक्षरश: हादरुन गेला होता. हे अचानकपणे असं कसं झालं? याचं उत्तर मात्र कुणाकडेच नव्हतं? केवळ आठ मिनिटांमध्ये आणि जमिनीपासून अवघ्या दहा फूट अंतरावर तो थरार घडला होता. हेलिकॉप्टरचा वरचा भाग पूर्णपणे तुटला होता. पुढचा भाग, हेलिकॉप्टरचे पंखे सगळं काही नष्ट झालं होतं. पण त्या हेलिकॉप्टरमध्ये असलेले आसाराम बापूसह पाच जण थोडक्यात बचावले होते. हे दुर्घटनाग्रस्त झालेलं हेलिकॉप्टर वीस वर्ष जुनं असल्याचं बोललं जातंय. तसेच वेळोवेळी देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे ते दुर्घटनाग्रस्त झालं असावं अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

थोडक्यात बचावले होते अर्जुन मुंडा
आसाराम बापू हेलिकॉप्टर दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेत त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा हे देखील अशाच पद्धतीने