www.24taas.com, मुंबई
बलात्काराचे आरोप झाल्यानंतर अखेर लक्ष्मण माने अखेर पोलिसांना शरण आले....सरेंडर होण्यापूर्वी माने यांनी झी २४तासवर आपली बाजू मांडलीय...या सगळ्या प्रकरणावर माने यांचं काय म्हणणं आहे?
सातारा जिल्ह्यातील सोमंथळी हे लक्ष्मण माने यांचे मुळगाव. कैकाडी या भटक्या विमुक्त जमातीत जन्मलेल्या माने यांनी `उपरा` हे आत्मकथन 1980 साली लिहिले. लहानपणापासूनच्या जगण्याचे चित्र त्यांनी शब्दरुपात मांडले. या पुस्तकाला 1981 साली साहित्य अकादमी आणि फोर्ड फाऊंडेशन पुरस्काराने गौरविण्यात आले. पुस्तकाचं हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषेत भाषांतर करण्यात आलंय.
मानेंनी भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेची स्थापना केली.दरम्यानच्या काळात त्यांनी बंद दरवाजा, पालावरचे जग, विमुक्तायन, उध्वस्त, भटक्याचे भारूड, काय करायचे शिकुन?, खेळ साडेतीन टक्क्यांचा ही पुस्तके लिहीली. तर प्रकाशपुत्र हे नाटक आणि क्रांतीपथ हा काव्यसंग्रहही लिहीला. याच दरम्यान त्यांनी राजकारणीचीही वाट धरली आणि त्याकामी त्यांना शरद पवार यांची मदत झाली. 1990 ते 1996 या कालावधीत विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळाले. 2009 साली राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे स्थापनेपासून ते सदस्य आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या पुणे, सातारा, कोल्हापूर येथील आश्रमशाळांमध्ये 1000 पेक्षा जास्त मुले शिक्षण घेत आहेत...
समाजिक तसेच राजकीयक्षेत्रात लक्ष्मण माने यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती....मात्र त्यांच्या या कारकिर्दिला काळी किनार असल्याचं २४ मार्चला उघड झालं.... 24 मार्चला मानेंविरोधात तीन महिलांनी बलात्काराची तक्रार दाखल केली.. आणि पुढे मानेंविरुद्ध अशा प्रकराची तक्रार करणा-या महिलांची संख्या सहावर जाऊन पोहोचलं... लक्ष्मण माने चालवत असलेल्या संस्थांमधील या तक्रारदार महिला आहेत.
लक्ष्मण मानेंविरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मात्र ते आरोप फेटाळून लावले होते. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लक्ष्मण माने फरार झाले होते. याच दरम्यान कोर्टाने त्यांना अंतरिम जामिन देण्यास नकार दिला..त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता...गेले १५ दिवस सातारा पोलिस त्यांचा शोध घेत होते...पण अखेर सोमवारी लक्ष्मण माने पोलिसांना शरण आले......त्यांच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील सत्य बाहेर येईल.
उपराकार लक्ष्मण माने य़ांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. साता-याच्या पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. संस्थेतल्या स्वय़ंपाकी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 2003 ते 2010 काळात बलात्कार झाल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. इतर दोन महिलांनीही अशा प्रकारचा जबाब दिलाय. त्यामुळं लक्ष्मण माने यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. माने यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.
उपराकार लक्ष्मण माने यांच्या विरोधात आश्रमशाळेतील तीन महिलांनी लेंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. यासंदर्भात पोलीस चौकशी आणि पंचनामे करतायत. यावर लक्ष्मण माने यांची कन्या आणि संस्थेची संचालक समता जीवन यांनी हे एक षडयंत्र असल्याचे म्हटलंय. तसंच शाळेच्या स्वयंपाकीण महिलांशी संवाद साधला असता त्यांनाही धक्का बसला असल्याचं त्यांनी म्हटलंय. आजपर्यंत असा अनुभव किंवा असं काहीही घडत असल्याचं निदर्शनासही आलं नाही. असं या महिलांनी म्हटलंय