www.24taas.com
राजीव गांधींच्या हत्येपूर्वी काही मिनिटे आधी घेण्यात आलेली एलटीटीईच्या आत्मघातकी पथकाची दोन छायाचित्र सगळ्या जगाने पाहिली...त्याच दोन फोटोवरुन तपास यंत्रणांनी राजीव गांधींच्या खुन्यांना शोधून काढलं...पण आता एक नवीन माहिती समोर आलीय..राजीव गांधींच्या हत्येपूर्वी सभेच्या ठिकाणावरचा एक व्हिडिओ आयबीच्या हाती लागला होता...पण आजवर त्याची कुठेच वाच्यता करण्यात आली नाही हे विशेष
राजीव गांधी ....भारताला संगणक युगाची ओळख करुन देणारा नेता ... दुरद़ृष्टीच्या या नेत्याला केवळ पाच वर्षच भारताचं पंतप्रधानपद भोगता आलं ..कारण सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यमदूत बनून आलेल्या एका महिलेनं राजीव गांधींचा घात केला...
एलटीटीईचा मानवी बॉम्ब ... राजीव गांधी हत्याकांडाने अवघ्या जगाला हादरुन टाकलं होतं...मृत्यूचा अकराळविकराळ चेहरा जगानं पाहिला होता....विशेष म्हणजे त्या घटनेचे फोटो काढण्याची जबाबदारी एलटीटीईने एका फोटोग्राफरवर टाकली होती..
पण या प्रकरणात आता नवीन आणि खळबळजनक माहिती उजेडात आली आहे.. राजीव गांधींच्या खुन्यांचे केवळ दोनचं फोटो उपलब्ध आहेत असं नाही तर बॉम्बस्फोटापूर्वीची चित्रफितही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे...धक्कादायक बाब म्हणजे आज पर्यंत त्या चित्रफितीविषयी कोणतीच माहिती जनतेसमोर उघड करण्यात आली नव्हती....
राजीव गांधीच्या हत्येनंतर तब्बल २१ वर्षांनी हा गौप्यस्फोट झाला असून त्यामुळे संपूर्ण देश हादरुन गेला आहे...
राजीव गांधींची हत्याकरणापूर्वी त्यांच्या खुन्यांचं सभास्थळावरचं व्हि़डिओ शुटिंग उपलब्ध असल्याचा खळबळजनक दावा राजीव गांधी हत्याकांडातील मुख्य तपास अधिकारी के. राघोथामन यांनी
कॉन्स्पिरेसी टू किल राजीव गांधी - फ्रॉम सीबीआय फाईल्स या आपल्या पुस्तकात केलाय.
गुप्तचर खात्याचे तत्कालीन प्रमुख एम.के . नारायणन यांनी जानूनबूजून हा अत्यंत महत्वाचा पुरावा उघड केला नसल्याचा आरोप राघोथामन यांनी आपल्या पुस्तकात केलाय..
`आमच्या तपासानुसार राजीव गांधी हत्याकांडीतील आरोपी राजीव गांधींची सभा सुरु होण्यापूर्वी अडीच तास आधी स्टेराईल झोनमध्ये उभे होते`
ती चित्रफित जगासमोर न आल्यामुळेच तामिळनाडू पोलिसांच्या सुरक्षेविषयी कोणी सवाल केला नाही..राजीव गांधी सभास्थानी आल्यानंतरच धनूने स्टेराईल झोनमध्ये प्रवेश केल्याचा दावा तामिळनाडू पोलिसांनी केला होता..
तामिळनाडू पोलिसांना क्लिन चीट देण्याच्या उद्देशातून ती चित्रफिती दडपण्यात आली नव्हती तर अनेक बड्या नेत्यांना वाचविण्यासाठी ती चित्रफित आजपर्यंत उघड करण्यात आली नाही असा दावा राघोथामन यांनी आपल्या पुस्तकात केलाय..
तसेच एम.के नारायणन यांना या प्रकरणी सुरुवातीलाच क्लिन चिट देण्यात आली असून राजीव गांधींच्या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख डी.आर. कार्तिकेयन यांनी एम.के नारायणन यांनी क्लिन चीट दिली होती..
राजीव गांधी हत्याकांड प्रकरणाचा तपास करणा-या पथकाचे प्रमुख के.राघोथामन यांनी आपल्या पुस्तकात केवळ त्या चित्रफितीचा उल्लेख केलाय असं नाही तर ज्या कारणामुळे ती चित्रफित जगासमोर आली नाही त्यावर मत नोंदवलं आहे..तत्कालीन आयबी प्रमुखांनी ती चित्रफित जाणून बुजून दडवून ठेवल्याचा आरोप राघोथामन यांनी केलाय..
राजीव गांधींची हत्या करण्यापूर्वी घेण्यात आलेली खुन्यांची केवळ ही दोनचं छायाचित्र उपलब्ध आहेत का ? राजीव गांधी हत्याकांडाच्या तपास पथकाचे प्रमुख राघोथामन यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत महत्वाचा ठरणार आहे..राघोथामन यांच्या म्हणण्यानुसार राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी सभास्थळावरच्या हलचालिंची चित्रफित गुप्तचर विभागाला मिळाली होती...पण ती चित्रफित कधीच जनतेसमोर उघड करण्यात आली नाही..त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत...
के. राघोथामन यांच्या म्हणण्यानुसार ते राजीव गांधी हत्याकांडाच्या तपास पथकाचे प्रमुख असतांना त्यांना ती चित्रफित तपासासाठी उपलब्ध करुन देण्यात आली नाही..पण न्यायाधीश जे.एस. वर्मा आयोगाच्या अहवालातून त्यांना या चित्रफितीची माहिती समजली होती..गुप्तचर विभागाचे तत्कालीन प्रमुख एम.के नारायणन यांनी तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेख यांना एक पत्र लिहिलं होतं ..त्या पत्राची एक प्रत वर्मा आयोगाच्या अहवालात राघोथामन यांना आढळून आली होती..ते पत्र २२ मे १९१९१ म्हणजेच राजीव गांधींच्या