हिरोईन ४२०

नेमकं असं काय घडलं अभिनेत्री लीनाच्या बाबतीत ज्यामुळे तिला थेट पोलीस कोठडीत जावं लागलं ते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 30, 2013, 11:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आलीकडचं तिने टॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि काही काळातच ती यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचली. तिला दक्षिणेतल्या चित्रपचटात चांगल्या भूमिका मिळू लागल्या....पण आता ती पोलीस कोठडीत जावून पोहचलीय...पण नेमकं असं काय घडलं अभिनेत्री लीनाच्या बाबतीत ज्यामुळे तिला थेट पोलीस कोठडीत जावं लागलं ते....
लाईट्स...कॅमेरा...एक्शन...च्या दुनियेतील एक सुंदर चेहेरा...या चेह-यावर जीव ओवाळून टाकणा-यांची संख्या काही कमी नाही...रुपेरी पडद्यावर तिची एन्ट्री होताच थिअटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो...
ग्लॅमरच्या दुनियेत मोठी प्रसिद्धी मिळवलीय..पण आता या सुंदर चेह-यावरचा मेकअप उतरला असून तिचा खरा चेहरा जगासमोर आलाय..एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केली फसवणूक ...फसवणूक प्रकरणी अभिनेत्री गजाआड...
ज्या सुंदर चेह-याविषयी सिनेरसिकांमध्ये नेहमीच चर्चा होत असे ,त्या अभिनेत्रीचं नाव आता गुन्हेगारांच्या यादीत नोंदलं गेलंय..दक्षिण भारतातील सिनेसृष्टीत काम करणारी ही अभिनेत्री लवकरच बॉलीवूडमध्ये जॉन इब्राहमसोबत एका हिंदी सिनेमात झळकणार होती...पण आता तिच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आलीय..तिला दिल्ली पोलिसानी अटक केलीय..
प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या लीना मॉरिया या अभिनेत्रीला फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय..ती दिल्लीतील एका फार्महाऊसवर लपून बसली होती..पण तिच्यावर लपण्य़ाची वेळ का आली हे आपण पहणार आहोत..मात्र त्यापूर्वी तिने गुन्हेगारीचा मार्ग का निवडला यावर नजर टाकणार आहोत..महागड्या कार्स खरेदी करण्याचा तिला छंद होता..
रॉल्स रॉयस जिची किंमत जवळपास 3 कोटी आहे...ऑस्टिन मॉर्टिन जिची किंमत जवळपास 1.50 कोटी
हमर जिची किंमत जवळपास 1.50 ते 2 कोटीच्या घरात आहे...
ऑडी Q7 जिची किंमत जवळपास 70 लाख रुपये आहे
अशा आलिशान 9 कार्स फसवणूक करुन लीनाने मिळवल्या होत्या..
२५ वर्षीय लीना या आलिशान कार्सचा ताफा घेऊन दिल्लीतल्या याच फार्महाऊसमध्ये लपून बसली होती..तिच्यासोबत तिचा मित्रही इथंच होता..पण पोलिसांची अनेक दिवसांपासून या फार्महाऊसवर नजर होती..कारण या अभिनेत्रीच्या अटकेनंतर फसवणूकीच्या गुन्हांची एक मालिकाच उघड होणार होती आणि त्यासाठी पोलिसांना ठोस पुराव्यांची गरज होती..
25 वर्षीय लीनाने मॉडेलिंग केलं तसेच काही मोठ्या चित्रपटातून भूमिकाही साकारल्या त्यामुळे तिला पैसा आणि प्रसिद्धी मिळाली..पण असं असतानाही लीना गुन्हेगारीकडं का वळली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...रुपेरी पडद्यावरची हिरोईन आणि तिचा मित्र या दोघांनी कशा पद्धतीने लोकांना गंडा घातला त्याची ही कहाणी..
लीनाने या ग्लॅमरच्या दुनियेत दोन वर्षापूर्वी पाऊल ठेवलं होतं..खरंतर हे विश्वचं वेगळं असून इथ येण्याची प्रत्येकालाच इच्छा असते..२५ वर्षीय लीनाने
हजबंड इन गोवा
कोबरा
रेड चिली
या चित्रपटातून काम केले तसेच
मद्रास कॅफे
या बॉलीवूडपटात महत्वाची भूमिका ती काम करतेय..
या ग्लॅंमरच्या दुनियेत काम करत असतांना तिच्या गरजा वाढल्या होत्या..ऐशोआरामात राहण्याची तिला सवय लागली होती..आणि त्यामुळेच तिने आपला मार्ग बदलला..तिनं असं काही स्क्रिप्ट निवडलं जिथ बेसुमार पैसाही आहे आणि बदनामीही... या फिल्मचा हिरो होता चंद्रेशखर आणि हिरोईन लीना..
लीनाचा ब्वॉयफ्रेंड चंद्रशेखर आपण IAS असल्याचं सांगत असे, मोठा प्रोजेक्ट मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने लोकांकडून कोट्यवधी उकळले. एका शहरात लोकांना गंडा घातल्यानंतर लीना आणि चंद्रशेखर हे दुस-या शहरात जात असतं..या दोघांनी एक बनावट फर्म सुरु करुन त्यानावे १९ कोटी रुपयांचं कर्जही घेतलं आणि त्यानंतर ते दोघे तेथून पसार झाले...

याप्रकरणी लीना आणि चंद्रशेखर विरुद्ध दोन तक्रारी दाखल झाल्या आणि त्यानंतर फर्मचा व्यवस्थापक ,त्याची पत्नी,त्यांना कर्ज मिळवून देण्यात मदत करणा-या बँक व्यवस्थापकाला अटक केल्यानंतर पोलिसांनी लीनाला जेरबंद केलं
अब्जावधी रुपयांची फसवणूक केल्यानंतर हे दोघे दिल्लीत दाखल झाले होते..ते इथं नवीन सावज शोधत होते..त्यासाठी त्यांनी दिल्लीत भाड्याने एक फार्म हाऊस घेतला होता..फार्महाऊसचं भाडं महिन्याला चार लाख रुपये इतकं होतं...याच फार्म हाऊससमोर तिच्या त्या अलिशान कार्सचा ताफाही उभा होता..या कार्समधून ती लोकांना भेटण्यासाठी जात असे..त्यामुळेच समोरच्या व्यक्तीवर लीना आणि तिच्या मित्राचा प्रभाव पडत असे...एकदा का व