रहस्य डान्सबारच्या तळघराचं...!

सहा वर्षपूर्वी राज्य सरकारने डान्सबार वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला..खरं तर सरकारच्या या निर्णयाचं समाजाच्या सर्वच स्तरातून स्वागत झालं.

Updated: Mar 16, 2013, 11:37 AM IST

www.24taas.com, मुंबई
सहा वर्षपूर्वी राज्य सरकारने डान्सबार वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला..खरं तर सरकारच्या या निर्णयाचं समाजाच्या सर्वच स्तरातून स्वागत झालं..आणि त्यामागचं कारणही तसचं होतं...डान्सबार विरोधात जनतेत असंतोष वाढत होता विषेषता महिलांनी त्याविरोधात जोरदार मोहिम उघडली होती..आणि त्यामुळेच सरकारला तो निर्णय घ्यावा लागला..बारमध्ये तळघर... होय... M 4 U या बारमध्ये चक्क एक तळघर तयार करण्यात आल होत..पोलिसांना चकवा देण्यासाठी ते तयार करण्यात आलं होतं..त्या तळघराचा दरवाजा अशा पद्धतीने तयार करण्यात होता की तो पाहून त्यावर कुणालाच संशय येत नव्हता...पण मुंबई पोलिसांच्या चाणाक्ष्य नजरेतून तो सुटू शकला नाही.....
मुंबईच्या दहिसर परिसरातील या M 4 U नावाच्या बारवर गुरुवारी रात्री मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पथकाने छापा मारला...कारण इथं बारबालांची छमछम सुरु असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती...बारच्या नावाखाली डान्सबार चालविला जात होता...बारमधलं माहौल काही वेगळाच होता...रंगीबेरंगी दिव्यांचा मंदप्रकाश बारचं काही सांगून गेला...पोलिसांनी या कारवाईत बारमध्ये असलेले गि-हाईक तसेच बार कर्मचा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं...पण अश्लील हावभाव करुन नृत्य करणा-या बारबाला मात्र गायब झाल्या होत्या... त्यांना शोधून काढण्याचं आव्हान पोलीसांसमोर उभ ठाकलं होतं...... समाज सेवा शाखेच्या पथकाने बारच्या आतील बाजूची बारकाईने पहाणी केली तेव्हा त्यांना बारच्या भींती आड दडलेल्या तळघराचा माग मिळाला...खरंतर तळघराकडं जाणा-या मार्गाचा दरवाजा सहजा सहजी कुणाच्या लक्षात येणार नाही असाच होता..तो लिफ्टचा दरवाजा असावा असाच प्रथम पहाणा-याला भास होईल अशी व्यवस्था तिथ करु ठेवली होती. पण पोलिसांच्या चाणाक्ष्य नजरेतून तो सुटू शकला नाही...
पोलिसांनी तो दरवाजा उघडण्यासाठी अग्नीशमन दलाची मदत घेतली...तो भक्कम दरवाजा तोडण्यासाठी तब्बल तीन तास लागले.....तो उघडल्य़ानंतर बारमधील तळघराचं रहस्य उघड झालं....हे तळघर बारबालांना लपण्यासाठी तयार करण्यात आलं होतं.....पोलीस आल्याचं समजताच बारबाला या दरवाजामार्गे तळघरात लपून बसत असतं ..त्यामुळे आज पर्यंत त्या पोलिसांच्या हाती लागल्या नाहीत..मात्र यावेळी त्या तळघराचं रहस्य पोलिसांपासून लपून राहिलं नाही...पोलिसांनी या तळघरातून सात तरुणींना बाहेर काढण्यात यश मिळवलं आणि बारच्या नावाखाली सुरु असलेल्या डान्सबारचा पर्दाफाश केला.... राज्यात डान्सबार बंद असल्याचा दावा गृहमंत्र्याकडून केला जातो..मात्र वास्तव काही वेगळचं आहे..पोलिसांकडून आधूनमधून केल्या जाणा-या कारवाईतून ते वारंवार उघड झालं आहे..
या छुप्या डान्सबारचा मुद्दा तर चक्क विधान परिषदेत गाजला होता... हे दृश्य बघितल्यानंतर इथं काय सुरू होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही.. दहिसरच्या या M4U बारमध्ये डिस्को लाईट्सच्या मंद प्रकशात बारबालांची छमछम सुरू होती.. मात्र पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पथकानं छापा मारून बारबालांसह 65 जणांना अटक केलीय.. खर तरं राज्य सरकारनं 6 वर्षांपूर्वी डान्स बारवर बंदी घातलीय.. त्यामुळे राज्यात डान्सबार चालवणं बेकायदेशीर आहे. पण राज्याच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत आज अनेक ठिकाणी बारच्या नावाखाली बारबालांची छमछम सुरूचं आहे. राज्यात डान्सबार बंद झाल्याचा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडून वारंवार केला जातो. मात्र 2011 साली भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी आबांचा दाव्यातील फोलपणा उघड केला होता.. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी डान्स बार सुरू असल्याचा आरोप आमदार फडणवीस यांनी केला होता..बारच्या नावानीशी तिथं सुरू असलेल्या बारबालाच्या नृत्याची सिडी सभागृहात सादर केल्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला होता..
राज्य सरकारने डान्सबारवर घातलेली बंदी ही केवळ कागदावरच असून स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादाने राज्यात डान्स बार सुरू असल्याचा आरोप त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना आबांनी पोलिसांची बाजू घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.. तसेच पोलिसांच्या संमतीने डान्स बार सुरू असल्यास 24 तासाच्या आत निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी घोषणाही आबांनी दिली होती.. मात्र m 4 u वरच्या छाप्यानंतर जो धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय तो पहाता डान्सबार बंदी केवळ कागदावरच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय....